esakal | भारतावरील संकटाने ब्रेट ली गहिवरला; बिटकॉईनच्या रुपात केली मोठी मदत
sakal

बोलून बातमी शोधा

BRETT LEE

भारतावरील संकटाने ब्रेट ली गहिवरला; बिटकॉईनच्या रुपात केली मोठी मदत

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- पॅट कमिन्सचे अनुकरण करत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही कोरोना काळात भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. दररोज 3 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. अशात 44 वर्षीय ब्रेट लीने 1 बिटकॉईन म्हणजे जवळपास 40,95,991 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्याने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. याआधी कमिन्सने 50 लाख अमेरिकी डॉलर्सची मदत पीएम केअर्स फंडमध्ये केली होती. ब्रेट ली सध्या IPL 2021 साठी भारतात आहे.

ब्रेट लीने ट्विटमध्ये म्हटलंय की, ''भारत माझ्यासाठी नेहमीच दुसरं घर राहीलं आहे. येथील लोकांकडून मिळालेल्या प्रेमाची माझ्या हृद्यात नक्कीच विशेष जागा आहे. कोरोना काळात भारत संकटात सापडला आहे. अशा काळात भारतीय लोकांच्या त्रासामुळे मला दु:ख होतंय. ही वेळ एकत्र येण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची आहे.'' ब्रेट लीने पॅट कमिन्सबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. वेल डन पॅट कमिन्स असं तो म्हणाला आहे.

हेही वाचा: कमिन्सनं जिंकलं! ऑक्सिजन खरेदीसाठी लाख मोलाची मदत

दरम्यान, PM Cares Fund साठी दिलेला मदत निधीचा वापर देशातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन खरेदीसाठी करावा, असा उल्लेख कमिन्स केला होता. कोलकाताच्या संघाने 2020 च्या आयपीएल हंगामात ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्ससाठी 15.50 कोटी मोजले होते. मुंबईच्या वानखेडेवर झालेल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सनं 34 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 66 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीनं लाखो क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या पॅट कमिन्सने कोरोनासाठी मदतीचा हात पुढे करुन आता इतर भारतीयांच्या मनात स्थान मिळवणारा निर्णय घेतला आहे.

भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून मंगळवारी 3.23 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 2771 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. लोकांच्या हॉस्पिटलसमोर रांगा लागत आहेत. अशावेळी अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. ब्रिटनने बुधवारी 100 व्हेंटिलेटर आणि 95 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचा दिले आहे. आयर्लंडनेही 700 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भारताकडे रवाना केले आहे.

loading image
go to top