esakal | कमिन्सनं जिंकलं! ऑक्सिजन खरेदीसाठी लाख मोलाची मदत

बोलून बातमी शोधा

pat cummins
कमिन्सनं जिंकलं! ऑक्सिजन खरेदीसाठी लाख मोलाची मदत
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून खेळणारा पॅट कमिन्सनं ( Pat Cummins) भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लाख मोलाची मदत केलीये. त्याने PM Care Fund मध्ये तब्बल 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत केलीय आहे. आपल्या अन्य सहकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन पॅट कमिन्सने केलाय.

देशातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कठिण परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार आणि प्रशासनाची कसरत सुरु आहे. संकटजन्य परिस्थितीत अनेकजण आवश्यक वस्तूंची कमतरता भरुन काढण्यासाठी पुढे येत आहेत. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात असणारा आणि भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजनने पुण्यातील लोकांसाठी मोबाईल व्हॅन दिल्याचे पाहायला मिळाले होते. कोरोना संकटात मदतीचा हातभार लावणारा पॅट कमिन्स कोलकातासंघाकड

हेही वाचा: लॉकडाऊनमध्येही IPL 'अनलॉक' का? जाणून घ्या यामागची कारणे

ट्विटच्या माध्यमातून पॅट कमिन्सने यासंदर्भातील माहिती दिली आहे. एक खेळाडू म्हणून माझी काही जबाबदारी आहे. PM Cares Fund साठी दिलेला मदत निधीचा वापर देशातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन खरेदीसाठी करावा, असा उल्लेखही कमिन्सने केलाय. कोलकाताच्या संघाने 2020 च्या आयपीएल हंगामात ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्ससाठी 15.50 कोटी मोजले होते. मुंबईच्या वानखेडेवर झालेल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सनं 34 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 66 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीनं लाखो क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या पॅट कमिन्सने कोरोनासाठी मदतीचा हात पुढे करुन आता इतर भारतीयांच्या मनात स्थान मिळवणारा निर्णय घेतला आहे.