T20 World Cup India Squad : ब्रेट ली म्हणतो; भारताने एक मोठी चूक केली, ऑस्ट्रेलियात त्यांनी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brett Lee Umran Malik

T20 World Cup India Squad : ब्रेट ली म्हणतो; भारताने एक मोठी चूक केली, ऑस्ट्रेलियात त्यांनी...

Brett Lee Umran Malik : भारताच्या टी 20 वर्ल्डकप संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज कोण हे अजून ठरत नाहये. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर अजूनही संघ व्यवस्थापनाने त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने भारतीय संघाच्या निवडीवर टीका केली आहे. त्याच्या मते भारताने ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी 20 वर्ल्डकप संघात उमरान मलिक सारख्या वेगवान गोलंदाजाची निवड न करण्याची मोठी चूक केली आहे.

हेही वाचा: BCCI President Election : CSK चे सर्वेसर्वा श्रीनिवासन यांनी गांगुलीची गेम केली?

खलीज टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ब्रेट ली म्हणाला की, 'उमरान मलिक हा 150 किमी प्रतीसात वेगाने गोलंदाजी करतो. ज्यावेळी तुमच्याकडे जगातील सर्वोत्तम गाडी असताना तुम्ही ती गॅरेजमध्ये उभी करून ठेवता. मग अशी गाडी असून काय उपयोग? भारताच्या वर्ल्डकप संघात उमरान मलिकची निवड व्हायला हवी होती.'

ब्रेट ली पुढे म्हणाला की, 'हो तो अजून युवा आहे. तो रॉ आहे. मात्र तो 150 किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करतोय. त्यामुळे त्याला संघात घ्या. त्याला ऑस्ट्रेलियात खेळवा जिथे चेंडू वेगाने उसळीही घेतो. जर तुमच्याकडे 140 किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज असता तर गोष्ट वेगळी होती. तुमच्याकडे 150 किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे.'

उमरान मलिकने यंदाच्या आयपीएल हंगामात सनराईजर्स हैदराबादकडून दमदार कामगिरी करत 14 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात पदार्पण देखील केले. सध्याच्या घडीला उमरान मलिक हा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज आहे.

हेही वाचा: Women's Asia Cup Semi Final 1 : निम्मा संघ गारद करत थायलंडने भारताला 148 धावात रोखले

दरम्यान, ब्रेट ली म्हणाला की, 'जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीने सतावले आहे. वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी मोठा धक्का आहे. मी असं नाही म्हणणार की भारत वर्ल्डकप जिंकू शकत नाही. भारत एक मजबूत संघ आहे. मात्र जसप्रीत बुमराह असता तर तो अधिक मजबूत झाला असता. बुमराच्या नसण्याने भुवनेश्वर कुमार सारख्या गोलंदाजांवर दबाव येणार.' येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात आयसीसी टी 20 वर्ल्डकप सुरू होत आहे. भारताचा पिहला सामना पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबरला होणार आहे.