Ind vs Wi : वर्ल्डकप मधून बाहेर गेल्यावर विंडीजच्या संघात उलथापालथ! भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी घेतला मोठा निर्णय

brian lara-join-west indies
brian lara-join-west indies

India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय निवड समितीने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर केला नाही. विंडीज संघाने या मालिकेपूर्वी एका अनुभवी खेळाडूवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

brian lara-join-west indies
ODI WC 2023 : सिकंदर झिम्बाब्वेला भारतात घेऊन येणार की... स्कॉटलंड घालणार खोडा! काय आहे समीकरण

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजने अनुभवी ब्रायन लाराला संघात सामील केले आहे. त्याच्याकडे परफॉर्मन्स मेंटॉरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लाराने वेस्ट इंडिज संघासोबत प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळले असून त्याला कोचिंगचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादचा प्रशिक्षक आहे.

brian lara-join-west indies
IND vs WI: 'या' 3 खेळाडूंनी वाढवलं ​​कोच-कर्णधाराचं टेन्शन! वेस्ट इंडिजविरुद्ध Playing-11 मध्ये जागा कोणाला?

ब्रायन लाराने क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये दहा हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने 131 कसोटीत 34 शतकांसह 53 च्या सरासरीने 11953 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम फक्त लाराच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 400 धावा केल्या होत्या. त्याच वेळी त्याने 299 एकदिवसीय सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीने 10405 धावा केल्या आहेत ज्यात 19 शतकांचा समावेश आहे.

वेस्ट इंडिजचा संघ 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडला आहे. 2023 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतही या संघाला नेदरलँड आणि स्कॉटलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com