Brian Lara SRH Coach : टॉम मूडीचा सनरायझर्स हैदराबादला रामराम, संघाचा कोच म्हणून ब्रायन लाराची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SunRisers Hyderabad IPL 2023

Brian Lara SRH Coach : टॉम मूडीचा हैदराबादला रामराम, कोच म्हणून ब्रायन लाराची नियुक्ती

SunRisers Hyderabad IPL 2023 : सनरायझर्स हैदराबादने मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. फ्रेंचायझीने आता वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज ब्रायन लारा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मूडीजच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने 2022 साली अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती.

SRH ने ट्विटरवर लारा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. मुथय्या मुरलीधरन लाराचा सहाय्यक असेल. आयपीएल 2022 नंतर मूडीजचा कार्यकाळ संपला आणि फ्रँचायझीने आगामी हंगामासाठी मुदतवाढ दिली नाही. सनरायझर्स हैदराबादने ट्विटरवर लिहिले, आमच्यासोबतचा त्यांचा कार्यकाळ संपत आहे. आम्ही टॉमचे SRH मधील योगदानाबद्दल आभार मानू इच्छितो. गेल्या अनेक वर्षांपासून हा एक अद्भुत प्रवास आहे. आम्ही त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने 2016 मध्ये फक्त एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मूडी 2013 ते 2019 पर्यंत सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक होते. यादरम्यान संघ 5 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला तर एकदा चॅम्पियनही झाला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हल बेलिसला 2020 मध्ये सनरायझर्सचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. मात्र वर्षभरानंतर टॉम मूडीला पुन्हा सनराइजमध्ये ही जबाबदारी देण्यात आली. पण त्याचा दुसरा टप्पा चांगला राहिला नाही. आयपीएल 2022 मध्ये 14 पैकी 8 सामने गमावल्यानंतर सनरायझर्स आठव्या क्रमांकावर राहिला. गेल्या हंगामात ब्रायन लारा सनरायझर्सचा फलंदाजी प्रशिक्षक होता. संघातील खेळाडूंशी त्याचे चांगले संबंध आहेत. अशा स्थितीत सनरायझर्सने ब्रायन लारा यांची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.