Brij Bhushan Singh :बृजभूषण यांचा अजब दावा; ऑलिम्पिक पदक मिळवू शकत नाहीत म्हणून हे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest

Brij Bhushan Singh :बृजभूषण यांचा अजब दावा; ऑलिम्पिक पदक मिळवू शकत नाहीत म्हणून हे आंदोलन

Brij Bhushan Sharan Singh : गेल्या दोन दिवसांपासून भारतातील अव्वल दर्जाचे कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 30 कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्या विरोधात जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. ते हुकूमशहाप्रमाणे कुस्ती महासंघाचा कारभार करत असल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या आरोपांवर बृजभुषण सिंग यांनी एक अजब प्रतिक्रिया दिली. एएनआयने ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार बृजभुषण सिंग यांनी आंदोलनकर्ते कुस्तीपटू ऑलिम्पिक पदक मिळवू शकत नाही म्हणून आंदोलन करत आहेत.

हेही वाचा: Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाला प्रियांकांचा फुल्ल सपोर्ट; म्हणाल्या, आरोपींची..

बृजभूषण सिंग आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'कुस्तीत तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी ही 22 ते 28 या वयादरम्यान करू शकता. जे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत ते ऑलिम्पिक पदक जिंकू शकत नाहीत. त्यामुळे ते रागात आहेत म्हणून ते आंदोलन करत आहेत.'

विशेष म्हणजे बृजभूषण यांचे वक्तव्य विरोधाभास निर्माण करणारे आहे. कारण दिल्लीतील जंतर मंतरवर सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करणाऱ्या 30 कुस्तीपटूंमध्ये टोकियो ओलिम्पिक कांस्य पकदविजेता बजरंग पुनिया, रिओ ऑलिम्पिक पकद विजेती साक्षी मलिक आणि दोनवेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणारी विनेश फोगाट यांचाही समावेश आहे.

हेही वाचा: Sunil Gavaskar : हे क्रिकेट नाही! सुनिल गावसकर इशान किशनवर जाम भडकले

या सर्वांनी भारतातील कुस्ती वाचवण्यासाठी बृजभूषण सिंग यांची त्वरित उचलबांगडी करावी अशी मागणी केली आहे. विनेश फोगाटने सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे देखील आरोप केले आहेत.

लैंगिक छळाच्या आरोपाबाबत बृजभूषण सिंग म्हणाले की, 'जर मी लैंगिक छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला तर स्वतःला फाशी लावून घेईन.' एएनआयने दिलेल्या माहितीनुसार सिंग पुढे म्हणाले की, 'तुमच्यासमोर कोणता एखादा व्यक्ती आहे का जो सांगू शकेल की फेडरेशन खेळाडूंचा छळ करतय.. फेडरेशनविरूद्ध गेल्या 10 वर्षात कोणाला कोणतीच तक्रार नव्हती का? ज्यावेळी नवे नियम लागू करण्यात आले त्यावेळी हा विषय पुढे आला आहे.'

(Sports Latest News)

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून