
गेल्या काही वर्षांपासून भारतीय कुस्ती वर्तुळातून काही वादग्रस्त घटना समोर आल्या. त्यातीलच एक म्हणजे दोन वर्षांपूर्वी भारताच्या काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बृजभूषण यांना WFI चे अध्यक्षपदही सोडावे लागले होते. तसेच त्यांच्यावर न्यायलयात केसही उभी राहिली होती. मात्र, आता त्यांना दिलासा मिळाला आहे.