Thank You For Everything; बुमराचा मलिंगासाठी भावनिक मेसेज

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जुलै 2019

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि यॉर्करकिंग लसिथ मलिंगाने काल (ता.26) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने त्याच्यासाठी तू क्रिकेटला जे काही दिलंस त्या सर्वासाठी धन्यवाद, असे भावनिक ट्विट केले आहे. 

नवी दिल्ली : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि यॉर्करकिंग लसिथ मलिंगाने काल (ता.26) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने त्याच्यासाठी तू क्रिकेटला जे काही दिलंस त्या सर्वासाठी धन्यवाद, असे भावनिक ट्विट केले आहे. 

''तू क्रिकेटसाठी जे काही दिलंय त्यासाठी सर्वांसाठी तुझे खूप आभार. मी नेहमीच तुझा आदर केला आहे आणि यापुढेही करत राहील,'' असे भावनिक ट्विट त्याने केले आहे. 

बुमरा आणि मलिंगा हे दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. दोघेही बराच काळ एकत्र खेळल्याने त्यांच्यातील बॉंडींग चांगले आहे. 
मलिंगाने बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात 38 धावांत 3 फलंदाजांना बाद केले. विश्वकरंडकातही त्याने सात सामन्यांमध्ये 13 बळी घेतले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bumrah Posts An Emotional Message For Lasith Malinga