Butterfly UTT Season 7: गोव्यात रंगणार टेबल टेनिसचा महासंग्राम; 'डेम्पो गोवा' आणि 'यू मुंबा' आमनेसामने

गोव्यात सुरू होत असलेल्या बटरफ्लाय यूटीटी सीझन ७ मध्ये डेम्पो गोवा चॅलेंजर्स आणि गतविजेते यू मुंबा टीटी यांच्यातील सलामीचा सामना टेबल टेनिसप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
Butterfly UTT Season 7 Goa

Goa Hosts Butterfly UTT Season 7 as Dempo Goa Take on Defending Champions U Mumba TT

sakal

Updated on

भारताचे दिग्गज टेबल टेनिसपटू आणि जगातील काही सर्वोत्तम खेळाडू गोव्यात आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनिस’ (UTT) सीझन ७ ची सुरुवात गुरुवार, ९ जुलै रोजी होणार आहे. या हंगामाची सुरुवात एका जबरदस्त ‘वेस्टर्न डर्बी’ने (पश्चिम विभागातील संघांमधील लढत) डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. यजमान आणि दोन वेळा विजेतेपद पटकावणारा ‘डेम्पो गोवा चॅलेंजर्स’ संघाचा सामना गतविजेत्या ‘यू मुंबा टीटी’ संघाशी होणार आहे. पुढील १८ दिवस सात संघ या प्रतिष्ठित विजेतेपदासाठी झुंज देतील आणि अंतिम सामना २६ जुलै रोजी खेळवला जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com