Chess Tournament: वैशालीचा पराभव, पण अजूनही शर्यत खुली; माजी विश्वविजेत्या झोंगी टॅनसमोर आता मोठं आव्हान!

Vaishali Loses Crucial Match in Candidates Tournament: आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत आर. वैशालीला पराभवाचा धक्का बसला असून आता ती माजी विश्वविजेती झोनगी टॅन हिच्याविरुद्ध निर्णायक सामना खेळणार आहे. स्पर्धेत चुरस अधिक तीव्र झाली आहे.
Chess Tournament

Chess Tournament

sakal

Updated on

पाफोस (सायप्रस) : भारताच्या आर. वैशाली हिने आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याची संधी गमावली. चीनच्या जिनर झू हिच्याविरुद्धच्या लढतीत तिचा पराभव झाला. यामुळे आता बाराव्या फेरीनंतर जिनर झू व आर. वैशाली यांच्यामध्ये प्रत्येकी सात गुणांसह बरोबरी आहे. आता या स्पर्धेतील दोन फेऱ्या अद्याप शिल्लक आहेत. आर. वैशालीसमोर १३व्या फेरीमध्ये चीनची माजी विश्वविजेती झोनगी टॅन हिचे आव्हान असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com