Candidates Chess : गुकेशने अव्वल मानांकित फॅबियानोला रोखले, मात्र गुजराथीचा सलग दुसरा पराभव

Candidates Chess : कँडिडेट चेस स्पर्धेत भारताचा आर. प्रज्ञानंद दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
Fabiano Caruana and D Gukesh | Chess
Fabiano Caruana and D Gukesh | ChessSakal

Candidates Chess Tournament : भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश याने रविवारी (7 एप्रिल) मध्यरात्री झालेल्या लढतीत अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुअना याला रोखले. दोन खेळाडूंमधील ही लढत ड्रॉ झाली.

मात्र, भारताच्या विदित गुजराथी याला आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील चौथ्या फेरीत हार पत्करावी लागली. रशियाच्या इयान नेपोनियात्ची यांच्याकडून गुजराथीचा पराभव झाला.

डी. गुकेश- फॅबियानो कॅरुअना यांच्यामधील लढतीत भारताच्या पठ्ठ्याने काळ्या मोहरांनी सुरुवात केली. लढतीच्या मध्यावर गुकेश दबावाखाली आला होता; पण दबावाखाली त्याने आपला खेळ बिथरू दिला नाही. कॅरुअनाला त्याने विजयापासून दूर ठेवले. अखेर ७४ चालींनंतर ही लढत ड्रॉ राहिली.

Fabiano Caruana and D Gukesh | Chess
Chess Tournament : प्रज्ञानंदची गुजराथीवर मात ; आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा ,गुकेश, इयान, फॅबियानो अव्वल स्थानी

नेपोनियात्ची दुसऱ्या विजयासह पहिल्या स्थानी

आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत रशियाचा इयान नेपोनियात्ची याने दुसऱ्या विजयासह तीन गुणांनिशी पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. डी. गुकेश व फॅबियानो कॅरुअना हे २.५ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

आर. प्रज्ञानंद दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. एलिरेझा फिरॉझा, निजात एबासोव, हिकारु नाकामुरा व विदित गुजराथी या चारही बुद्धिबळपटूंना १.५ गुणांची कमाई करता आली आहे.

२४ चालींनंतर ड्रॉ

आर. प्रज्ञानंद- हिकारु नाकामुरा यांच्यामधील लढत २४ चालींनंतरच ड्रॉ झाली. प्रज्ञानंद आपल्या अद्‌भूत खेळाच्या जोरावर सर्वांनाच प्रभावित करीत आहे. नाकामुराविरुद्धच्या लढतीतही त्याने आपली चमक दाखवली. प्रज्ञानंदविरुद्ध जोखीम न घेता नाकामुरा याने ड्रॉवर समाधान मानले.

Fabiano Caruana and D Gukesh | Chess
Candidates Chess: भारताच्या विदीतचा मोठा उलटफेर, वर्ल्ड नंबर-3 च्या खेळाडूला दिला पराभवाचा धक्का; प्रज्ञानानंद मात्र पराभूत

हम्पीचा धक्कादायक पराभव

महिला विभागात भारताची अनुभवी खेळाडू कोनेरू हम्पी हिला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. बल्गेरियाच्या नुरग्यूल सॅलीमोवा या युवा महिला खेळाडूने हम्पीवर मात करताना उल्लेखनीय खेळ केला. या पराभवामुळे हम्पी फक्त १.५ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

चीनची टॅन झोंगयी ही तीन गुणांसह महिला विभागात पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारताची आर. वैशाली दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com