esakal | मुंबईकराने वॉर्नरला दिला शॉक; रिअ‍ॅक्शन व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

David Warner

मुंबईकराने वॉर्नरला दिला शॉक; रिअ‍ॅक्शन व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीनं टीम इंडियात स्थान मिळवलेल्या सूर्यकुमार यादव क्रिकेट वर्तुळातील चर्चेत असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने नुकतेच क्रिकबझसाठी खास मुलाखत दिली. यावेळी प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी त्याला ऑल टाईम IPL इलेव्हनसंदर्भात प्रश्न विचारला होता. ऑल टाईम IPL इलेव्हन निवडण्यासाठी त्याला स्वत:सह 11 सदस्य निवडायचे होते. यात मुंबई इंडिन्समधील चारपेक्षा अधिक खेळाडू घेता येणार नाहीत ही अटही घालण्यात आली होती. (Cant Believe He Left Me Out David Warner Reacts on SuryaKumar Yadavs All Time IPL XI)

मुंबई इंडियन्सच्या स्टायलिस्ट फलंदाजाने आपल्यासह रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रित बुमराहला या संघात स्थान दिले. विकेट किपर निवडताना त्याने धोनीपेक्षा जोस बटलरला पसंती दिली. भारतीय संघाचा आणि आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्सही त्याच्या संघात आहेत. रोहित शर्मा आणि जोस बटलर यांना त्याने ओपनर म्हणून निवडले आहे. आपल्या संघात त्याने हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा आणि आंद्रे रसेल याला स्थान दिल्याचे पाहायला मिळते. तर गोलंदाजीमध्ये बुमराहसह मोहम्मद शमी आणि राशीद खानला त्याने पसंती दिलीये.

हेही वाचा: SL vs IND : रिझर्व्ह टीमच्या ताफ्यातही कोरोना; मालिकाच संकटात

डेविड वॉर्नर, सुरेश रैना,मलिंगा, शेन वॉटसन आणि धोनीशिवाय ऑल टाईम इलेव्हन काहींना खटकणारी निश्चितच असेल. यावर चक्क वॉर्नरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने अधिकृत ट्विट अकाउंटवरुन सूर्यकुमार यादवने निवडलेल्या संघ पोस्ट करत मला बाहेर बसवलं याचं आश्चर्य वाटतं, अशी रिअ‍ॅक्शन दिली आहे.

हेही वाचा: VIDEO : हमारी छोरियां छोरो से कम है के; हरलीनचा कॅच बघाच!

डेविड वॉर्नर हा आयपीएलमधील यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने सातत्यपूर्ण 6 हंगामात 500 + धावा केल्या आहेत. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीला पराभूत करुन आयपीएल टायटल जिंकले होते. या हंगामात वॉर्नरने 848 धावा केल्या होत्या.

loading image