esakal | SL vs IND : रिझर्व्ह टीमच्या ताफ्यातही कोरोना; मालिकाच संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka Team

SL vs IND : रिझर्व्ह टीमच्या ताफ्यातही कोरोना; मालिकाच संकटात

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाविरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेपूर्वी इंग्लंडहून परतलेल्या श्रीलंकन संघातील सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामुळे नियोजित मालिकेच्या वेळापत्रकात बदल झाला. यात आता आणखी भर पडली आहे. श्रीलंकेच्या ताफ्यातील एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. (Sri Lankan player COVID positive) श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेळापत्रकात बदल (India vs Sri Lanka Series New Schedule) केला असला तरी भारत-श्रीलंका मालिकेवरील संकट अजून टळलेलं नाही.

क्रिक वायरच्या वृत्तानुसार, श्रीलंकेचा फलंदाज संदुन वीराक्कोडी याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. हा खेळाडू दाम्बुला स्थिती सराव शिबिरात सहभागी झाला होता. श्रीलंकेची रिझर्व्ह टीम याठिकाणी आहे. इंग्लंड दौऱ्यावरुन परतलेल्या खेळाडूंशिवाय भारताविरुद्ध मैदानात उतरण्याचा प्लॅन श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आखत आहे. याच प्लॅनचा एक भाग म्हणून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक ग्रुप दाम्बुला येथे एकत्रित ठेवला आहे. याच ठिकाणी सराव करत असलेल्या खेळाडूचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची चिंता आणखी वाढलीये. कारण हा संघही आता भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता धूसर होत आहे.

हेही वाचा: SL vs IND : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंकेचा इंग्लंड पॅटर्न?

श्रीलंकन संघाचे हॉटेलही बदलले

श्रीलंका क्रिकेट संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्याची मागणी बीसीसीआयने केली होती. ही विनंती मान्य करत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना समुद्रा हॉटेलमधून ग्रँड सिनामनमध्ये शिफ्ट केले आहे. भारतीय संघातील खेळाडू हे समुद्रा हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. भारतीय खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीव बीसीसीआयने ही विनंती केली होती. जर हा दौरा रद्द झाला तर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला 90 कोटींचे नुकसान होणार आहे.

हेही वाचा: VIDEO : हमारी छोरियां छोरो से कम है के; हरलीनचा कॅच बघाच!

भारत-श्रीलंका शेड्युलमध्ये मोठा बदल

कोरोनामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील नियोजित दौऱ्यात बदल करण्यात आलाय. 13 जुलैपासून रंगणारी वनडे मालिका आता 18 जुलैपासून सुरु होणार आहे. दुसरीकडे टी-20 मिलिकेतील पहिला सामना 20 जुलैला रंगले. भारतीय संघाचा हा दौरा 25 जुलैपर्यंत होता. सुधारित वेळापत्रकानुसार दौऱ्यातील अखेरचा सामना 29 जुलैला रंगणार आहे. वेळापत्रकातील या बदलानंतर आणखी एक कोरोनाची केस समोर आल्यामुळे दौऱ्यावर पुन्हा एकदा संकट घोंगावत आहे.

loading image