esakal | CPL 2021, Semi-Final Schedule: पोलार्डचा धमाका, नाईट रायडर्सनं गाठली सेमीफायनल
sakal

बोलून बातमी शोधा

kieron pollard

CPL 2021, Semi-Final Schedule: पोलार्डचा धमाका, नाईट रायडर्सनं गाठली सेमीफायनल

sakal_logo
By
सुशांत जाधव

Caribbean Premier League 2021, Semi-Final Schedule: कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. गुरुवारी केरॉन पॉलार्डच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ट्रिनबागो नाईट रायडर्सने सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. पोलार्डने 20 चेंडूत अर्धशतक साजरे केल्या. त्याच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर नाईट रायडर्सच्या संघाने 4 विकेट राखून विजय मिळवला.

पहिल्यांदा बॅटिंग करताना ड्वेन ब्रावोच्या नेतृत्वाखालील सेंट किट्स अँण्ड नेव्हिस पॅट्रियट्स संघाने निर्धारित 20 षटकात 147 धावा केल्या होत्या. जोशुआ डिसिल्‍वाने 45 चेंडूत 50 धावा केल्या. शेरफेन रदरफोर्ड आणि ड्वेन ब्रावोने 25-25 धावांचे योगदान दिले. केरॉन पोलार्डच्या धमाक्यासमोर हे आव्हान किरकोळ ठरले. पोलार्डने 22 चेंडूत 51 धावा केल्या. यात त्याने 3 चौकार आणि 5 षटकार खेचले. 231 च्या स्ट्राइक रेटनं धावा काढणारा पोलार्ड 15 व्या षटकात बाद झाला. पण त्याने त्याचे काम पूर्ण केले होते.

हेही वाचा: US Open Final: मेदवेदेवनं नंबर वन जोकोविचला रडवलं!

सेमी फायनल वेळापत्रक

ट्रिनबागो नाइट रायडर्स विरुद्ध सेंट लूसिया किंग्ज

वार्नर पार्क, सेंट किट्स 14 सप्टेंबर, सायंकाळी साडेसात वाजता

गुयाना अमेझन वारियर्स विरुद्ध सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स वार्नर पार्क, सेंट किट्स 15 सप्टेंबर दुपारी साडेचार वाजता

कॅरेबियन लीगचा अंतिम सामना 15 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. ही फायनल झाल्यानंतर कॅरेबियन खेळाडू आयपीएलसाठी युएईला रवाना होती. केरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सला जॉइन करेल. त्याच्यासह अन्य खेळाडूही आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.

loading image
go to top