esakal | US Open Final: मेदवेदेवनं नंबर वन जोकोविचला रडवलं!
sakal

बोलून बातमी शोधा

US Open Final: मेदवेदेवनं नंबर वन जोकोविचला रडवलं!

US Open Final: मेदवेदेवनं नंबर वन जोकोविचला रडवलं!

sakal_logo
By
सुशांत जाधव

US Open Final : दुहेरी विक्रमाच्या उंबरठ्यावर असलेल्या सर्बियाच्या नंबर वन नोवाक जोकोविचवर रशियन डॅनिल मेदवेदेव भारी पडला. अमेरिकन ओपनच्या फायनल लढतीत जोकोविचला मेदवेदेव ने 6-4, 6-4, 6-4 असे पराभूत केले. या कॅलेंडर स्लॅमच्या स्वप्नाला सुरंग लावणाऱ्या पराभवानंतर जोकोविचला अश्रू अनावर झाले.

अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीमध्ये जोकोविचचे पारडे जड मानले जात होते. फायनल जिंकून त्याला कॅलेंडर स्लॅमसह पुरूष गटात विक्रमी ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी होती. पण न्यूयॉर्कच्या कोर्टवर रंगलेल्या लढतीत मेदवेदेवनं मोठा विजय नोंदवत जोकोविचचं स्वप्न अक्षरश: धुळीस मिळवले.

हेही वाचा: मुंबईकर रोहित भारताचा कर्णधार?, विराट राजीनाम्याच्या तयारीत

अमेरिकन ओपनच्या 14 वर्षांच्या इतिहासात मेदवेदेव ही स्पर्धा गाजवणारा नववा टेनिस स्टार ठरला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच मेदवेदेवनं आपला दबदबा कायम ठेवला. दुसऱ्या बाजूला जोकोविच दबावात खेळताना दिसले.

loading image
go to top