Alcaraz Vs Fognini : अल्काराझची सलामी फाबिओविरुद्ध; सोमवारपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डनचा ड्रॉ जाहीर
Wimbledon Men Singles : विम्बल्डन २०२४ स्पर्धेत कार्लोस अल्काराझची सुरुवात इटलीच्या वादग्रस्त खेळाडू फाबिओ फोग्निनीविरुद्ध होणार आहे. ड्रॉनुसार संभाव्य क्वार्टर फायनलमध्ये जोकोविच, सिनर, रिबाकिना, स्विएतेक यांच्यात टक्कर होऊ शकते.
लंडन : वादग्रस्त असलेल्या इटलीच्या फाबिओ फोग्निनी याच्याविरुद्धच्या सामन्यातून कार्लोस अल्काराझ आपल्या तिसऱ्या विम्बल्डन विजेतेपदासाठीची मोहीम सुरू करेल. प्रतिष्ठेची विम्बल्डन स्पर्धा येत्या सोमवारपासून सुरू होत आहे.