क्रीडा जगत CBI च्या रडारवर; IOA चे अध्यक्ष बत्रांची चौकशी सुरू | CBI Will Probe Indian Olympic Association president Narinder Batra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI Will Probe Indian Olympic Association president Narinder Batra

क्रीडा जगत CBI च्या रडारवर; IOA चे अध्यक्ष बत्रांची चौकशी सुरू

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (Indian Olympic Association) अध्यक्ष नरिंदर बत्रा (Narinder Batra) यांच्याविरूद्ध सीबीआयने (CBI Investigation) प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. त्यांच्यावर हॉकी इंडियासाठी देण्यात आलेल्या 35 लाखांचा फंडाचा गैरवापर केला असल्याचा आरोप होत आहे. याबाबतची माहिती आज (दि. 06) अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: भारताच्या जावयाला कोहलीनं दिला बॅक मसाज; व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडे बत्रा यांच्याविरूद्ध तक्रार करण्यात आली होती. या आधारे सीबीआयने बत्रा यांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात प्रथम दर्शनी गुन्हा घडल्याचे दिसत असल्यानेच ही करावाई करण्यात आली आहे. हाकी इंडियासाठी आलेला 35 लाख रूपयांचा फंड बत्रा यांनी वैयक्तिक फायद्यासाठी वापरला अशी तक्रार सीबीआयकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा: VIDEO: RCB फॅन कार्तिकला 'टॉपर' तर कोहलीला 'बॅक बेंचर' का म्हणत आहेत?

दरम्यान, बत्रा आणि हॉकी इंडिया यांच्यात टर्फवरून वाद झाला होता. यावेळी पुरूष हॉकी संघाच्या कामगिरीवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. बत्रा यांच्यावर 1975 मध्ये वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या अस्लम शेर खान यांनी बत्रा यांच्या हॉकी इंडियातील हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. खान म्हणाले होते की, 'इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे प्रमुख बत्रा यांचे भारतीय हॉकीमध्ये हस्तक्षेप हा लाभाचा मुद्दा आहे. ते आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे पदाधिकारी आहे. त्यांना राष्ट्रीय हॉकी फेडरेशनमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाहीत.' खान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात हॉकी इंडियामधील काही अनियमित नियुक्त्यां संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यात बत्रा यांना आजीवन सदस्यत्व देण्याबाबतचा देखील मुद्दा आहे.

Web Title: Cbi Will Probe Indian Olympic Association President Narinder Batra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top