esakal | रोनाल्डोचा बोलबाला; गोलचा मान डिबालाला
sakal

बोलून बातमी शोधा

cristiano-ronaldo

रोनाल्डोचा बोलबाला; गोलचा मान डिबालाला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मॅंचेस्टर - ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ओल्ड ट्रॅफर्डवरील ‘पुनरागमना’मुळे बहुचर्चित ठरलेल्या चॅंपियन्स लीगमधील सामन्यात युव्हेंट्‌सने मॅंचेस्टर युनायटेडला एकमेव गोलने हरविले. १७व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा खेळाडू पाऊलो डिबाला याने केलेला गोल निर्णायक ठरला.

पूर्वार्धात इटालियन विजेत्या युव्हेंट्‌सला अनेक संधी मिळाल्या. चेंडूवर ७० टक्के ताबा राखताना त्यांनी दहा शॉट मारले होते. मॅंचेस्टर युनायटेडला दुसऱ्या सत्रात थोडाफार सूर गवसला; पण पॉल पोग्बा याचा फटका गोलपोस्टला लागून रिबाउंड झाला. 

रोनाल्डो आकर्षण
चॅंपियन्स लीगचा ड्रॉ जाहीर झाल्यापासून रोनाल्डो या लढतीचे आकर्षण होता. अलीकडे बलात्काराच्या आरोपांमुळे तो वादात सापडला आहे. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नसून आपण आनंदात आहोत, असे विधान या लढतीच्या पूर्वसंध्येस त्याने केले होते. 

या पार्श्‍वभूमीवर त्याचे संघाबरोबर मैदानावर आगमन झाले, तेव्हा स्थानिक प्रेक्षकांनीही त्याचे जोरदार स्वागत केले. एका बाल चाहत्याने रोनाल्डोच्या नावाचा बॅनर आणला होता.

loading image
go to top