शमीच्या अडचणीत वाढ, पत्नी हसिन जहाँच्या तक्रारीवरुन आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 मार्च 2019

कोलकाता : भारताचा प्रमुख गोलंदाज महंमद शमीच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. शमीवर हुंड्यासाठी छळ आणि शारीरिक छळ केल्याबद्दल त्याच्यावर IPC 498A आणि 354A या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमीची पत्नी हसिन जहाँच्या तक्रारीवरुन कोलकाता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
 
मागील वर्षी हसिन जहाँने शारीरिक अत्याचार आणि फसवणुकीचा आरोप करत शमीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

त्याच्या पत्नीने यापूर्वी त्याच्यावर विवाहबाह्य संबंध, मॅट फिक्सिंग, देशद्रोह असे अनेक आरोप केले आहेत. या आरोपांनंतर कोलकता पोलिसांनी त्याची चौकशीही केली होती. त्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरु आहे. 

मोहम्मद शमी भारतीय संघातील खेळाडू आहे. आगामी विश्वचषकासाठी त्याच्याही नावाची चर्चा आहे. त्यात आता हसिन जहाँच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्याच्या विश्वचषक तयारीवर परिणाम होऊ शकतो. 

कोर्टाने शमीला समन्स बजावला असून, त्याला 22 जून रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. परंतु विश्वचषकादरम्यान सुनावणीसाठी हजर राहणे शमीसाठी काहीसे अडचणीचे होणार आहे.

मोहम्मद शमी आणि हसिन जहाँ यांची आयपीएलमधील संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या पार्टीत भेट झाली होती. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोन वर्षांनी 7 एप्रिल 2014 रोजी शमी आणि जहांचे लग्न झाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chargesheet filed against cricketer Mohammed Shami