CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravindra jadeja and ms dhoni
CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

CSK Player Retention Before IPL 2022 Mega Auction : आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी (IPL 2022 Mega Auction) चेन्नई सुपर किंग्जने अपेक्षेप्रणाने चार खेळाडू कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंह धोनीसह मागील हंगामात सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप पटकवलेल्या ऋूतराजलाही त्यांनी रिटेन केले आहे. चेन्नईच्या संघात रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये रविंद्र जाडेजाचाही समावेश आहे. या तीन भारतीय खेळाडूंसह परदेशी अष्टपैलू मोईन अलीला संघात कायम ठेवण्यात आले आहे.

रविंद्र जाडेजा हा चेन्नई सुपर किंग्जकडून रिटेन करण्यात आलेला पहिला खेळाडू ठरला. त्यामुळे त्याला 16 कोटी मिळाले. चेन्नईच्या रिटेन यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धोनीला 12 कोटी, मोईन अलीला 8 कोटी तर ऋतूराज गायकवाडला 6 कोटीत रिटेन करण्यात आले. मुंबई इंडियन्सप्रमाणेच चेन्नई सुपर किंग्जनेही रिटेनसाठी पर्समधील 90 कोटीपैकी 42 कोटी खर्च केले.

Web Title: Chennai Super Kings Decided Ravindra Jadeja Ms Dhoni Ruturaj Gaikwad And Moeen Ali To Retain For Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top