
Chess Olympiad : आश्चर्य! संघ भारतात पोहचूनही पाकिस्तानची माघार
चेन्नई : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी आज माहिती दिली की पाकिस्तानचा बुद्धीबळ संघ (Pakistan Chess Team) भारतात होणाऱ्या चेस ऑलिम्पियाडमध्ये (Chess Olympiad) सहभाग घेण्यासाठी भारतात दाखल झाला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे संघ भारतात पोहचूनही पाकिस्तानने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: Sebastian Vettel : चार वेळा F1 जिंकणाऱ्या सबॅस्टियन व्हेट्टलेने घेतली निवृत्ती
बुद्धिबळातील ऑलिंपिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिंपियाड स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. तामिळनाडू मधील महाबलीपुरम येथे ही स्पर्धा २८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत होणार असून यामध्ये यजमान भारताला विजेतेपदाची सुवर्णसंधी असणार आहे. भारताचे सहा संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. भारताला अमेरिका, नॉर्वे, अझरबैझान या देशांतील बुद्धिबळपटूंचे आव्हान असणार आहे.
हेही वाचा: SL vs PAK : जयसूर्याचा पंच; बाबर सेना 261 धावात ढेर
या स्पर्धेमधील खुल्या गटात १८८, तर महिला गटात १६२ संघ सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेमध्ये खुल्या गटात १८६ देशांचे, तर महिला गटात १६० देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतामध्ये पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिंपियाडचे आयोजन करण्यात आले आहे.
Web Title: Chess Olympiad Pakistan Taken A Decision Not To Participate Even After Team Reached India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..