SL vs PAK : जयसूर्याचा पंच; बाबर सेना 261 धावात ढेर

SL vs PAK: श्रीलंकेकडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव
sri lanka beat pakistan
sri lanka beat pakistanSAKAL

Sri Lanka vs Pakistan : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. प्रभात जयसूर्या आणि रमेश मेंडिस या फिरकी गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 246 धावांनी पराभव केला. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने विक्रमी लक्ष्य गाठत 4 विकेटने जिंकला, तर दुसऱ्या कसोटीत 246 धावांनी पराभव झाला.

sri lanka beat pakistan
Commonwealth Games 2022 : कोरोनाची धास्ती! भारताच्या ध्वजधारक सिंधूच्या रिपोर्टमध्ये...

श्रीलंकेने पहिल्या डावात 378 धावा केल्या होत्या. दुसरा डाव त्याने 8 विकेट्सवर 360 धावा करून घोषित केला. पाकिस्तानचा पहिला डाव 231 धावांत आटोपला. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानसमोर विक्रमी 508 धावांचे लक्ष्य होते. 176 धावांच्या पुढे खेळताना पाकिस्तानचा संघ पाचव्या आणि शेवटच्या दिवशी 261 धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 81 धावा केल्या तर इमाम-उल-हक 49 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जयसूर्याने दुसऱ्या डावात 5 तर रमेश मेंडिसने 4 बळी घेतले. पाहुण्या पाकिस्तान संघाने पाचव्या दिवशी 85 धावांत 8 विकेट गमावल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com