VIDEO | Chess Robot : बुद्धीबळ खेळणाऱ्या 7 वर्षाच्या मुलाचे रोबॉटने तोडले बोट

Chess Robot Broke 7 Year Old Child Finger During Chess Tournament In Russia
Chess Robot Broke 7 Year Old Child Finger During Chess Tournament In Russiaesakal

Chess Robot : रशियात (Russia) खेळल्या जात असलेल्या एका बुद्धीबळ स्पर्धेत (Chess Tournament) एक धक्कादायक घटना घडली. लहान मुलांच्या बुद्धीबळ स्पर्धा सुरू होती. या दरम्यान, 7 वर्षाच्या मुलाते रोबॉटने जखमी केले. रोबॉटबरोबरच्या (Chess Robot) सामन्यात हा मुलगा आपली चाल खेळत होता. त्यावेळीच या रोबॉटने या मुलाचे बोट तोडले.

ABC न्यूजच्या वृत्तानुसार 19 जुलैला मॉस्कोत मॉस्को चेस ओपन स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडू रोबॉटबरोबर बुद्धीबळ खेळत होते. याचवेळी सात वर्षाच्या मुलासोबत खेळत असलेल्या रोबॉटने सामना सुरू असतानाच मुलाचे बोट पकडले आणि ते दाबले.

Chess Robot Broke 7 Year Old Child Finger During Chess Tournament In Russia
BCCI चे पैसे संपले! दीपक हुड्डाने प्रसिद्ध कृष्णाची जर्सी का घातली?

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत रोबॉट या मुलाचे बोट दाबत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मुलाला असह्य वेदना होत असल्याने तो रडू लागला. दरम्यान जवळ उभे असलेल्या लोकांनी मुलाचे बोट साडवण्यासाठी जमले. या छोट्या मुलाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर त्याला रूग्णालयात देखील दाखल करण्यात आले.

Chess Robot Broke 7 Year Old Child Finger During Chess Tournament In Russia
Neeraj Chopra : रौप्य पदक विजेता नीराज पाकिस्तानच्या भालाफेकपटूला काय म्हणाला?

दरम्यान, स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले की जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. या स्पर्धेत जो रोबॉट वापरण्यात आला तो भाड्याने घेतला होता. यात आमची कोणतीच चूक नाही ही एक मशिनची चूक आहे. मात्र हे प्रकरण इथंच संपणार नाहये. कारण दुखापत झालेल्या मुलाचे आई - वडील या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहे. फेडरेशनद्वारे सांगितले गेले की, ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. आम्ही आमच्या परीने या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com