
Neeraj Chopra : रौप्य पदक विजेता नीराज पाकिस्तानच्या भालाफेकपटूला काय म्हणाला?
नवी दिल्ली : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद (World Athletics Championship) स्पर्धेत 88.13 मीटर भालाफेक करत रौप्य पदक (Silver Medal) पटकावले. अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये भारताला जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. त्यानंतर नीरज चोप्रा हा जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा दुसरा खेळाडू तसेच पहिला पुरूष खेळाडू ठरला आहे. दरम्यान नीरज चोप्राने पदक जिंकल्यानंतर आपला पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी भालाफेकपटू अर्शाद नदीम (Arshad Nadeem) याच्याशी संवाद साधला.
हेही वाचा: Axar Patel ने मोडला धोनीचा 17 वर्ष जुना रेकॉर्ड
नीरज चोप्रा म्हणाला की, 'मी अर्शादशी स्पर्धा संपल्यानंतर बोललो. मी त्याला तू चांगली कामगिरी केलीस असे सांगितले. त्यावेळी त्याने त्याच्या कोपराला दुखापत झाली होती असे सांगितले. मी त्याचे दुखापतीतून सावरत चांगली कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले. 86 मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकणे हे जबरदस्त असते.'2018 ला जकार्ता आशियाई स्पर्धेत अर्शाद आणि नीरजचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी या दोघांनी एकमेकांचे अभिवादन केले होते.
हेही वाचा: VIDEO: टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये इशान किशनची धुलाई, शिखरची पोस्ट व्हायरल
नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलबद्दल म्हणाला 'चौथ्या प्रयत्नानंतर मला माझ्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. त्यामुळे मला पूर्ण ताकदीनिशी भालाफेक करता आली नाही. ही गोष्ट माझ्या मनात होती. फक्त मला भाला फेकू शकतो का हे निश्चित करायचे होते. म्हणून मी माझ्या मांडीला पट्टी बांधली. मला आशा आहे की दुखापत फारशी गंभीर नसेल. मला सकाळी कळेल की माझी दुखापत कशी आहे.'
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ग्रेनडाच्या अँडरसन पेटर्सने 90.54 मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकले. तर चेक रिपब्लिकच्या जाकूब वॅड्लेचने कांस्य पदक जिंकले.
Web Title: Neeraj Chopra Reveal What Conversation He Had With Pakistan Javelin Thrower Arshad Nadeem
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..