बुद्धिबळ स्पर्धा: आनंदचे पुन्हा एकदा ‘ब्लॅक मॅजिक

केदार लेले
सोमवार, 21 जानेवारी 2019

क्रॅमनिक विरुद्ध आनंद
2018 च्या आवृतीत, 7व्या फेरीत इटालियनपद्धतीने झालेल्या डावात, क्रॅमनिक ने आनंदला पराभावाचा धका दिला होता. बरोबर एक वर्षाने 2019च्या आवृतीत आनंद परतला त्या पराभावाची सव्याज परतफेड करण्यासाठीच.

विक ऍन झी (हॉलंड) : बुद्धिबळ जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्यामाजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने आपणही 'ब्लॅक मॅजिक' करू शकतो, याची पुन्हा एकदा झलक दाखवून दिली. सातव्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळताना क्रॅमनिकवर विजय मिळवत या स्पर्धेत आनंदने संयुक्त आघाडी मिळवली. 

आनंद, कार्लसन, नेपोम्नियाची, डिंग लिरेन आणि अनिष गिरी यांची संयुक्त आघाडी!
आनंद, कार्लसन, नेपोम्नियाची, डिंग लिरेन आणि अनिष गिरी साडेचार गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.

सातव्या फेरीत तीन डाव निर्णायक
सातव्या फेरीत तीन डाव निर्णायक ठरले आणि चार डाव बरोबरीत सुटले. अनुक्रमे आनंद, फ़ॅन फॉरेस्ट आणि राजाबॉव यांनी विजय मिळवले.

राजाबॉव विरुद्ध विदित गुजराथी
एका उत्कंठापूर्व लढतीत राजाबॉवने विदित गुजराथी ला पराभूत केले! डाव वाचवायची नामी संधी विदित कडून निसटली आणि त्याच्या विरुद्ध राजाबॉवने विजयी गुण वसुल केला.

क्रॅमनिक विरुद्ध आनंद
2018 च्या आवृतीत, 7व्या फेरीत इटालियनपद्धतीने झालेल्या डावात, क्रॅमनिक ने आनंदला पराभावाचा धका दिला होता. बरोबर एक वर्षाने 2019च्या आवृतीत आनंद परतला त्या पराभावाची सव्याज परतफेड करण्यासाठीच.

या स्पर्धेच्या यंदाच्या आवृत्तीत, काहीसा सूर न गवसलेल्या क्रॅमनिकची कामगिरी चांगली होत नव्हती. पराभावाची सव्याज परतफेड करण्याची नामी संधी आनंदला चालून आली होती, पण अडसर होता काळ्या मोहऱ्यांनी डाव जिंकण्याचा.

7व्या फेरीत आनंद विरुद्ध क्रॅमनिक ने पुन्हा एकदा इटालियन पद्धत अवलंबली. माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद मात्र क्रॅमनिकच्या कमकुवत खेळाचा फायदा उठवू शकला नाही! ४०चालींच्या पहिल्या पडावा नंतर आनंद कडे अश्वांची जोडी होती तर क्रॅमनिक कडे उंटाची जोडी होती.  

"काँटे की टक्कर” - पटावर उंट श्रेष्ठ की अश्व
सर्वश्रुत असलेली बाब म्हणजे क्रॅमनिकला डावात उंटाच्या जोडीने खेळायला आवडते तर आनंदची पसंती असते अश्वांच्या जोडीने डाव खेळण्याची. पटावर उंट श्रेष्ठ की अश्व या यक्ष प्रश्नाचे उत्तर, हा डाव पुन्हा एकवार देईल म्हणून बुद्धिबळ प्रेमींची उत्कंठा अधिकच वाढली.

उंटाच्या जोडीने क्रॅमनिक आनंदचे अश्व निष्प्रभ करतो की आनंदचे अश्वांची जोडी क्रॅमनिच्या उंटाच्या जोडी निष्प्रभ करतो अशी “काँटे की टक्कर” बुद्धिबळ प्रेमींना अनुभवता आली.

क्रॅमनिकच्या चुकींचा फायदा उठवित आनंदने प्रभावी चाली रचल्या. आनंदने त्याचे अश्व आणि हत्ती ठिकाणबद्ध करीत, क्रॅमनिकच्या उंटांची जोडी निष्प्रभ करण्यात यश मिळवले.

आनंदचे पुन्हा एकदा ‘ब्लॅक मॅजिक
57व्या चालीला पराभव अटळ आहे हे लक्षात येताच क्रॅमनिकने डाव सोडला. 57व्या चालीला क्रॅमनिकने शरणागती पत्करली व आनंदने पुर्ण गुण वसुल केला. तसेच, या स्पर्धेत आनंदनेदुसऱ्यांदा काळ्या मोहऱ्यांनी डाव जिंकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chess tournament in holland Vishwanathan Anand wins