
विश्वनाथ आनंद नंतर भारताला बुद्धीबळात दुसरा वर्ल्ड चॅम्पियन मिळाला. डी गुकेशनं बुद्धीबळाच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा विश्वविजेता बनून इतिहास घडवला. त्यानं चीनच्या डिंग लिरेनला १४ व्या फेरीत हरवलं. डी गुकेशला विश्वविजेता बनताच कोट्यवधी रुपये प्राइज मनी म्हणून मिळाले. १८ वर्षीय गुकेशची नेट वर्थ यानंतर २० कोटींवर पोहोचलीय. यंदाच्या वर्षात विजेतेपदाची हॅट्ट्रिक करणाऱ्या गुकेशची संपत्ती या स्पर्धेआधी ८.२६ कोटी इतकी होती. पण विश्वविजेता होताच त्याच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ झाली. १७ दिवसात त्यानं ११ कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.