Chetan Sharma: काढून टाकलेल्या चेतन शर्मांनी केली जादू! पुन्हा झाले नव्या निवडसमितीचे चेअरमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India Selector Chetan Sharma

Chetan Sharma: काढून टाकलेल्या चेतन शर्मांनी केली जादू! पुन्हा झाले नव्या निवडसमितीचे चेअरमन

Chetan Sharma Chief Selector : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन निवड समितीची घोषणा केली आहे. चेतन शर्मा यांची या पदासाठी पुन्हा एकदा निवड झाली आहे. त्यांच्याशिवाय शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन सैराट यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

बीसीसीआयला निवडकर्ता पदासाठी 600 हून अधिक लोकांकडून अर्ज आले होते. निवड समितीची निवड क्रिकेट सल्लागार समिती करते. चेतन शर्मा पुन्हा एकदा निवड समितीचे अध्यक्ष असतील, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

हेही वाचा: Rishabh Pant: पंतच्या गुडघ्यावर तब्बल 4 तास चाललेली शस्त्रक्रिया अखेर संपली; मात्र आता...

सध्या भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे, त्यानंतर वनडे मालिकाही होणार आहे. नव्या निवड समितीसमोर आता न्यूझीलंड मालिकेसाठी संघ निवडीचे आव्हान असणार आहे. तसेच टी-20 फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार बनवायचा की नाही हा सर्वात मोठा निर्णय असेल. या वर्षी एकदिवसीय विश्वचषकही होणार आहे, अशा परिस्थितीत नव्या निवड समितीला आत्तापासूनच रोडमॅप तयार करावा लागणार आहे.

हेही वाचा: IND vs SL: पांड्या युझवेंद्र चहलला दाखवणार बाहेरचा रस्ता; 'या' अष्टपैलूला मिळणार संधी?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी जाहीर केले की, सुलक्षणा नायक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने नवीन अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीची निवड केली आहे. यासाठी सुमारे 600 अर्ज आले होते, त्यानंतर 11 जणांची निवड करण्यात आली आणि त्या सर्वांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या. अखेर सल्लागार समितीने या पाच जणांची वरिष्ठ निवड समितीसाठी निवड केली आहे.

मागील निवड समितीच्या कार्यकाळात टीम इंडियाला कोणतेही मोठे यश मिळाले नाही. आशिया चषक, दोन टी-20 विश्वचषकातील पराभवाशिवाय इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पराभवाने सर्वांनाच हैराण केले. यादरम्यान निवड समितीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला तेव्हा बीसीसीआयने निवड समिती हटवली होती.