Cheteshwar Pujara : वयाच्या 34 व्या वर्षी पुजाराने खेळली कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी - VIDEO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheteshwar Pujara london cup

Cheteshwar Pujara : वयाच्या 34 व्या वर्षी पुजाराने खेळली कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी - VIDEO

Cheteshwar Pujara london cup : भारतीय कसोटी संघाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये असून ससेक्स संघाकडून खेळत आहे. कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून ओळखला जाणारा पुजारा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये टी-20 शैलीत फलंदाजी करत आहे. इंग्लंडच्या रॉयल वन डे चषकात त्याने सलग दुसरे शतक झळकावले. ससेक्सकडून खेळताना त्याने सरेविरुद्ध 132 स्ट्राईक रेटने 131 चेंडूत 174 धावा केल्या. पुजाराने या खेळीत 20 चौकार आणि 2 षटकार मारले. यासोबतच पुजाराने वयाच्या 34 व्या वर्षी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली आहे.

चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीमुळे ससेक्सने 50 षटकांत 6 गडी गमावून 378 धावा केल्या. त्याच्याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या टॉम क्लार्कने 104 धावांची खेळी केली. पुजारा ससेक्सचा कर्णधारही आहे. याआधी त्याने वॉर्विकशायरविरुद्ध 107 धावांची खेळी करत आक्रमक शतक झळकावले होते. चेतेश्वर पुजारा 2014 पासून वनडे फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळलेला नाही.

पुजाराने भारतासाठी 96 कसोटी सामन्यांमध्ये 44 च्या सरासरीने 6792 धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 18 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. पुजारावर त्याच्या संथ फलंदाजीसाठी अनेकदा टीका केली जाते. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये जास्त संधी मिळाल्या नाहीत.

पुजाराला भारताकडून एकाही T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळाली नाही आणि तो फक्त 5 एकदिवसीय सामने खेळू शकला. त्याने 107 सामन्यात 12 शतके आणि 30 अर्धशतकांच्या मदतीने 4638 धावा केल्या आहेत. तो 20 वेळा नाबाद राहिला आहे आणि प्रत्येक तिसऱ्या डावात त्याने 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.