Cheteshwar Pujara: लंडनमध्ये चेतेश्वर पुजाराचे तुफान, एका षटकात ठोकले 22 धावा - VIDEO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheteshwar Pujara:

Cheteshwar Pujara: लंडनमध्ये चेतेश्वर पुजाराचे तुफान, एका षटकात ठोकले 22 धावा - VIDEO

Cheteshwar Pujara : भारतीय कसोटी संघाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये असून ससेक्स संघाकडून खेळत आहे. यापूर्वी कौंटी संघात दमदार कामगिरी केल्यानंतर चेतेश्वर पुजाराने आपली ताकद रॉयल लंडन वन डे चषकमध्ये दाखवले आहे. ससेक्सचा कर्णधार पुजाराने रॉयल लंडन वन डे चषकाच्या सामन्यात वॉर्विकशायरविरुद्ध 135 च्या स्ट्राईक रेटने आक्रमक शतक झळकावले. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेतेश्वर पुजाराने अवघ्या 79 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारच्या मदतीने 107 धावा केल्या.

हेही वाचा: MS Dhoni ने स्वातंत्र्य दिनाच्या आधी बदला इन्स्टाग्राम DP; 'भाग्य है मेरा, मैं एक भारतीय हूं'

चेतेश्वर पुजारा कसोटीत संयमी खेळीसाठी ओळखला जातो, परंतु येथे त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. चेतेश्वर पुजाराने डावाच्या 47 व्या षटकात एकूण 22 धावा लुटल्या. या षटकात पुजाराने 4, 2, 4, 2, 6, 4 धावा केल्या. मात्र, चेतेश्वर पुजाराची ही खेळीही संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. चेतेश्वर पुजारा 49 व्या षटकात बाद झाला, त्यानंतर संघाला विजयासाठी 20 धावांची गरज होती. मात्र ससेक्स विजयापासून 4 धावा दूर होता.

हेही वाचा: Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्यावर रिकी पाँटिंगचे मोठे वक्तव्य, म्हणाला...

लिस्ट-ए स्पर्धेच्या एका सामन्यात वॉर्विकशायरने प्रथम खेळताना 6 गडी गमावून 310 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ससेक्सचा संघ पुजाराच्या शतकानंतरही 7 विकेटवर 306 धावाच करू शकला. अशा प्रकारे वॉरविकशायरने हा सामना 4 धावांनी जिंकला. मात्र चेतेश्वर पुजाराच्या कर्णधार खेळीने सर्वांची मनं जिंकली.

Web Title: Cheteshwar Pujara Hundred In Royal London Odi Cup England 22 Runs One Over Sussex Video Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..