
Rahul Gandhi : रोहित की विराट... राहुल गांधी म्हणाले मला माहिती आहे की ही चांगली गोष्ट नाही
Rahul Gandhi On Virat Kohli Vs Rohit Sharma : काँग्रस नेते आणि खासदार राहुल गांधी सध्या भारतातील विविध लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. सामान्य जनतेशी आपली नाळ जोडण्यासाठी ते कधी कूली तर कधी मॅकेनिक यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांना आसामच्या प्रतिदिन मीडिया नेटवर्कने राजकारणाव्यतिरिक्त काही प्रश्न विचारले.
यात पॉप कल्चर, चित्रपट, क्रीडा, लाईफस्टाईल या विषयांचा समावेश होता. त्यांना भारताचे दोन स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यापैकी कोणता क्रिकेटपटू आवडतो असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वांच्यात भुवया उंचावल्या.
राहुल गांधींना प्रततिदिन या मीडिया नेटवर्कने काही रंजक प्रश्न विचारले. यात नेटफ्लिक्स की जीम असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी जीमची निवड केली. त्यांना दाढी ठेवणं आवडतं की नाही असं देखील विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला देखील माझ्याबद्दल हाच प्रश्न पडला आहे. मला विचाराल तर मी दाढी असावी की नको याची फारशी काळजी करत नाही.'
राहुल गांधींना द गॉड फादर आणि द डार्क नाईट या दोन चित्रपटांपैकी कोणता चित्रपट आवडतो असे देखील विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी दोन्ही चित्रपटाचे विषय हे खूप खोली असलेले आहेत त्यामुळे दोन्ही आवडतात असे सांगितले.
राहुल गांधीना तुम्ही राजकारणी नसता तर काय झाला असता असे विचारले असता त्यांना मी काहीही झालो असतो असं उत्तर दिले. आपल्या उत्तराचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की मी ज्यावेळी माझ्या भाच्यांसोबत असतो त्यावेळी मी शिक्षक असतो. मी किचनमध्ये असतो त्यावेळी शेफ असतो.'
खेळाबाबत विचारले असता राहुल गांधी यांनी क्रिकेट आणि फुटबॉलपैकी फुटबॉलला जास्त पसंती दिली. त्यांना रोनाल्डो आणि मेस्सीबद्दल विचारले असता त्यांनी रोनाल्डोची निवड केली. मेस्सी हा चांगला फुटबॉलपटू आहे मात्र रोनल्डोचा दयाळूपणा मला जास्त आवडतो असेही ते म्हणाले.
त्यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांपैकी एकाची निवड करायला सांगितली. त्यावेळी त्यांनी मी क्रिकेटचा खूप मोठा फॅन नाही. मला माहिती आहे की ही चांगली गोष्ट नाही मात्र मी चाहता नाही.'
शेवटी राहुल गांधी यांना इंडिया किंवा भारत असं विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी इंडिया दॅट इज भारत' असं उत्तर दिलं.
राहुल यांनी भारतासमोर संपत्तीचं केंद्रीकरण, संपत्तीच्या वाट्यामधील असलेली मोठी तफावत, बेरोजगारी, दलितांविरूद्ध असलेला भेदभाव, महागाई हे मोठे प्रश्न असल्याचे सांगायला विसरले नाहीत.