IPL 2021 मध्ये रेकॉर्ड ब्रेक बोली, 2022 मध्ये लगेच निवृत्ती | Chris Morris Retirement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chris Morris Retirement
IPL 2021 मध्ये रेकॉर्ड ब्रेक बोली, 2022 मध्ये लगेच निवृत्ती

IPL 2021 मध्ये रेकॉर्ड ब्रेक बोली, 2022 मध्ये लगेच निवृत्ती

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला (Chris Morris) २०२१ च्या आयपीएल (IPL) हंगामात राजस्थान रॉयल्सने तब्बल १६ कोटी २५ लाखाची बोली लावून आपल्या कळपात सामिल करुन घेतले. या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या बोलीला वर्ष उलटत नाही तोच ख्रिस मॉरिसने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. ख्रिस मॉरिसने सोशल मीडियाद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

हेही वाचा: Vivoने पळ काढला, TATA आता आयपीएलचे टायटल स्पॉन्सर

ख्रिस मॉरिसने इन्स्टाग्राम अकाऊंवर आपला फोटा पोस्ट करत लिहीले की, 'आज मी क्रिकेटच्या सर्व प्रकरातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करत आहे. ज्यांनी माझ्या या प्रवासात ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे आभार. हा एक रंजक प्रवास राहिला.' याच पोस्टमध्ये मॉरिसने आपला भविष्यातील प्लॅन देखील सांगितला. आता मॉरिस टायटन्स क्रिकेटसाठी प्रशिक्षकाची भुमिका बजावणार आहे. (Chris Morris Retirement)

हेही वाचा: 'तिसरी कसोटी म्हणजे १५ वर्षातील सर्वात मोठा सामना'

विशेष म्हणजे ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) २०२१ च्या आयपीएल हंगामात १६ कोटी २५ लाख रुपये बोली लावली होती. (Chris Morris Highest Auction Player in IPL History) आयपीएल इतिहासातील ही सर्वात मोठी बोली होती. यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली युवराज सिंगला (Yuvraj Singh) लागली होती. ख्रिस मॉरिसला रेकॉर्ड ब्रेक बोली लागल्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्याने निवृत्तीची घोषणा केली.

हेही वाचा: शमीने 'पंजा' मारला तर बसेल कुंबळे, श्रीनाथच्या पंक्तीत

ख्रिस मॉरिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa National Cricket Team) ४ कसोटी सामने खेळत १२ विकेट घेतल्या होत्या. याचबरोबर त्याने आफ्रिकेकडून ४२ एकदिवसीय सामन्यात ४८ तर टी २० मध्ये २३ सामन्यात ३४ विकेट घेतल्या आहेत. फलंदाजीत ख्रिस मॉरिसने कसोटीत १७३ धावा, एकदिवसीयमध्ये ४२ सामन्यात ४६७ तर टी २० क्रिकेटमध्ये २३ सामन्यात १३३ धावा केल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top