

FBI Probe on Claudio Tapia
esakal
ब्युनोस आर्यस: अर्जेंटिना फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष क्लॉडिओ टापिया यांची लाखो डॉलर्सच्या प्रायोजकत्व निधीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन(एफबीआय)कडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अशी कोणतीही चौकशी झाली नसल्याचा खुलासा अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने केला आहे.