Paris Olympic 2024: गोल्ड मेडल विजेत्या अर्शद नदीमला मुख्यमंत्री देणार १० कोटी, तर क्रिकेटपटूकडूनही बक्षीसाची घोषणा

Arshad Nadeem Prize Money: भालाफेकीमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने विक्रमी थ्रो करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Arshad Nadeem | Paris Olympic 2024
Arshad Nadeem | Paris Olympic 2024Sakal
Updated on

Arshad Nadeem Prize Money: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत गुरुवारी (८ ऑगस्ट) पुरुषांच्या भालाफेकीची अंतिम फेरी पार पडली. या फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने अव्वल क्रमांक पटकावला. यासह त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

तो ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने ऑलिम्पिकमधील विक्रम मोडत ९२.९७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक नावावर केले.

त्यानंतर त्याचे सध्या पाकिस्तानमध्ये कौतुक होत आहे. आता त्याच्यासाठी पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी पाकिस्तानी चलनानुसार १० कोटींच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी असंही सांगितलं की नदीमच्या गावात त्याच्या नावाने स्पोर्ट्स सिटीही बांधण्यात येईल.

Arshad Nadeem | Paris Olympic 2024
Paris Olympic 2024: आपली यारी, लय भारी! भारतीय हॉकीपटूंचं ऑलिम्पिक मेडल एकमेकांना घालत अनोखं सेलिब्रेशन, Video एकदा पाहाच

याशिवाय पाकिस्तानी क्रिकेटपटू अहमद शेहजादनेही त्याच्या फाऊंडेशन मार्फत नदीमसाठी १ मिलियन रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.

इतकेच नाही, तर पाकिस्तानी गायक अली जाफरनेही अर्शद नदीमला रोख १ मिलियनचे बक्षीस देऊ केले आहे. तसेच त्याने पाकिस्तान सरकारकडे त्याच्या नावाने स्पोर्ट्स ऍकेडमी सुरू करण्याची आणि त्याचे जंगी स्वागत करण्याची विनंती केली आहे.

नदीमने गेल्या अनेकवर्षात भालाफेकीमध्ये विशेष कामगिरी केली आहे. त्याने राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ आणि वर्ल्ड चॅम्पियनशीप २०२२ आणि २०२३ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

तसेच नदीम हा गेल्या ३२ वर्षात पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा पहिलाच खेळाडू आहे.

Arshad Nadeem | Paris Olympic 2024
Neeraj Chopra: नीरजच्या आईने अर्शदला लेक म्हटलंय, आता पाकिस्तानी खेळाडूची आई काय म्हणाली, पाहा Video

नीरजला टाकलं मागे

गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात नदीमने दोनवेळा ९० मीटरहून लांब भाला फेकला होता. त्याने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक नावावर केले. यासह त्याने अँड्रियास थॉर्किलडसेनने २००८ ऑलिम्पिकमध्ये ९०.५७ मीटर लांब भाला फेकल्याचा विक्रम मोडला.

तसेच गुरुवारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या नीरज चोप्रा त्याचा सिजन बेस्ट देत ८९.४५ मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक जिंकले. तसेच कांस्य पदक जिंकलेल्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटर लांब भाला फेकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com