द्रविड सरांकडून कानउघाडणी; अपयश अस्तित्वाची जाणीव करून देणारे

Coach Rahul Dravid Not Happy With Team Performance
Coach Rahul Dravid Not Happy With Team Performanceesakal

केप टाऊन : कसोटी मालिका गमावल्यानंतर एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारण्याची नामुष्की ओढावल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) निश्चितच नाराज झाले. त्यांनी अपयशास कारणीभूत असलेल्या सर्वांची नावे न घेता कानउघाडणी केली. तसेच हे अपयश टीम इंडियाला अस्तित्वाची जाणीव करून देणारे आहे, असेही स्पष्ट मत द्रविड यांनी व्यक्त केले.

तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याची (India Tour Of South Africa) सांगता होत असताना द्रविड स्वतः पत्रकार परिषदेत आले आणि त्यांनी टीम इंडियाच्या सर्व कमकुवत बाजूंवर बोट ठेवले. (Coach Rahul Dravid Not Happy With Team Performance)

Coach Rahul Dravid Not Happy With Team Performance
मालिका विजयानंतर केशव महाराजचे 'जय श्री राम'

संधी देऊ, पण योगदानाचे काय?

अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी काही खेळाडू प्रयत्नशील असतात, त्यांना आम्ही संधी देतो आणि आश्वस्तही करतो, पण त्याचवेळी त्यांनीही निर्णायक योगदान देऊन आमचा विश्वास सार्थ ठरवायचा असतो, असे सांगणाऱ्या राहुल द्रविड यांनी कोणाचेही नाव घेतले नाही; परंतु त्यांचा रोख श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिषभ पंत (Rishabh Pnat) यांच्याकडे होता. श्रेयस अय्यरला तिन्ही सामन्यांत संधी देण्यात आली; परंतु संघाला गरज असताना त्याने विकेट स्वतःत बहाल केली. रिषभ पंतने तर दुसऱ्या कसोटीप्रमाणे अंतिम एकदिवसीय सामन्यात पुन्हा बेजबाबदार फटका मारून संघालाही अडचणीत आणले.

फलंदाजीत अपयश

तिन्ही सामन्यांत २० ते ४० या मधल्या षटकांत आमच्या फलंदाजांना लय मिळवता आली नाही. मधल्या फळीत अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. तीनपैकी दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने (South Africa) २९० च्या आसपास धावा केल्या होत्या. ३० व्या षटकापर्यंत आम्ही चांगला पाठलाग करत होतो, परंतु महत्त्वाच्या क्षणी सुमार फटके मारून फलंदाजांनी विकेट गमावल्या.

Coach Rahul Dravid Not Happy With Team Performance
'भारतीय व्यापाऱ्याने कोकेन देऊन स्पॉट फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल केले'

अष्टपैलू खेळाडू हवा

संघाला समतोल साधण्यासाठी चांगल्या अष्टपैलू खेळाडूची गरज असल्याचे बोलताना द्रविड यांनी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचा उल्लेख केला; पण पहिल्या दोन सामन्यांत शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) आणि तिसऱ्या सामन्यात दीपक चहरने (Deepak Chahar) हार्दिक आणि जडेजा यांच्याएवढीच भरवशाची फलंदाजी करून दाखवली.

गोलंदाजांकडूनही निराशा

फलंदाजांप्रमाणे गोलंदाजही डावाच्या मध्यावर दक्षिण आफ्रिकेच्या जमलेल्या भागीदारी फोडण्यात अपयश आले. पहिल्या सामन्यात दोन, तर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून एक शतकी खेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com