मालिका विजयानंतर केशव महाराजचे 'जय श्री राम' |South Africa Allrounder Keshav Maharaj says Jai Shree Ram after winning ODI series against India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Keshav Maharaj says Jai Shree Ram
मालिका विजयानंतर केशव महाराजचे 'जय श्री राम'

मालिका विजयानंतर केशव महाराजचे 'जय श्री राम'

दक्षिण आफ्रिकेने भारताचा (India vs South Africa) एकदिवसीय मालिकेत ३ - ० असा मोठा पराभव केला. भारताने कसोटी मालिका देखील २ - १ अशी गमावली होती. त्यामुळे भारतीय संघ (Team India) एकदिवसीय मालिकेत कमबॅक करेल असे वाटत होते. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) युवा संघाने पहिले दोन सामने आरामत जिंकत आधी मालिका खिशात टाकली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने प्रतिकार केला मात्र हा प्रतिकार ४ धावांनी कमी पडला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्याची संधी मिळाली. (South Africa Allrounder Keshav Maharaj says Jai Shree Ram after winning ODI series against India)

हेही वाचा: VIDEO : पंतचा उतावळेपणा पाहून कोहलीही चिडला!

दरम्यान, मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी अष्टपैलू केशव महाराज (Keshav Maharaj) याने इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) लिहिली. या पोस्टच्या शेवटी त्याने जय श्री रामचा (Jai Shree Ram) नारा दिला. भारतीय वंशाचा केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी तसेच एकदिवसीय (ODI) संघातील एक महत्वपूर्ण सदस्य आहे. त्याने मालिका विजयानंतर इन्स्टाग्रावर संघाचे जल्लोष करतानाच फोटो शेअर केले.

या फोटाला त्याने 'काय मालिका होती. मला या संघांवर प्रचंड गर्व आहे. आम्ही मोठा विजय मिळवला. आता पुन्हा एकदा सज्ज होण्याची आणि पुढच्या मालिकेसाठी तयारी करण्याची वेळ आहे. जय श्री राम!' असे कॅप्शनही दिले आहे.

हेही वाचा: स्मृती मानधना ठरली 'आयसीसी वुमेन ऑफ द इयर'

केशव महाराजने एकदिवसीय मालिकेत तीन सामन्यात ३ विकेट घेतल्या होत्या. तर कसोटी मालिकेत १ विकेट घेतली होती.

Web Title: South Africa Allrounder Keshav Maharaj Says Jai Shree Ram After Winning Odi Series Against India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top