esakal | जारवो पुन्हा मैदानात; यावेळी थेट बॉलिंगच टाकली... पाहा VIDEO
sakal

बोलून बातमी शोधा

Jarvo-Invader

जारवो पुन्हा मैदानात; यावेळी थेट बॉलिंगच टाकली... पाहा VIDEO

sakal_logo
By
विराज भागवत

स्टेडियममधून जारवो वेगाने धावत आला अन्...

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाने पहिल्या डावात कर्णधार विराट कोहली आणि शार्दूल ठाकूर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १९१ धावांपर्यंत मजल मारली. ख्रिस वोक्सने चार बळी घेत भारतील गोलंदाजांना बांधून ठेवले. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ५३ धावांवर ३ बळी गमावले. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतरदेखील झटपट दोन बळी बाद झाले. पण त्यानंतर भारताला विकेटसाठी खूप वेळ वाट पाहावी लागली. याचदरम्यान एक मजेशीर गोष्ट घडली.

हेही वाचा: Video: रोहितने हवेत उडी मारून टिपलेला भन्नाट झेल एकदा पाहाच

कसोटी मालिकेत सातत्याने सामना सुरू असताना मैदानात घुसणारा जारवो चक्क चौथ्या कसोटीतही परत आला. त्याच्या मैदानात येण्याने काही काळ खेळ थांबला खरा पण त्याने जे केलं त्यानंतर त्याला ग्राऊंडस्टाफने थेट पकडून बाहेर नेले. जारवो मैदानात आला आणि त्याने रन अप घेऊन थेट इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला गोलंदाजीच केली. गोलंदाजी करताना त्याचा धक्का ओली पोपला लागला. त्यानंतर थोड्या वेळाने सारेच त्याच्या धमाल मस्तीला हसले, पण अखेर त्याला ग्राऊंडस्टाफने हाताला धरून मैदानाबाहेर नेले.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या आधीच्या सामन्यांमध्येही त्याने मैदानात हजेरी लावली होती. एका सामन्यात तो गोलंदाजी करण्याच्या इराद्याने आला होता. तो भारताचा खेळाडू असल्याचे सांगत त्याने गोलंदाजी मागितली होती. त्यानंतर एका सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यावर जारवो थेट पॅडिंग करून मैदानात फलंदाजीसाठी दाखल झाला होता. लीड्सच्या मैदानात त्याने केलेल्या या कृत्यामुळे त्याला लीड्स व्यवस्थापनाने कायमचे स्टेडियममध्ये येण्यापासून बॅन केले. तसे असले तरी ओव्हलच्या मैदानावर मात्र त्याने पुन्हा हजेरी लावली.

बॅटिंगला आलेला जारवो-

loading image
go to top