commonwealth games 2022
commonwealth games 2022 ESAKAL

CWG 2022 : पदकांची 'एकसष्ठी', 22 सुवर्ण पदकांसह भारताची राष्ट्रकुल मोहिम संपली

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत 22 सुवर्णपदके जमा झाली आहेत. पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे

Commonwealth Games 2022 : भारताने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये 61 पदकांची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी देखील भारताने सुवर्ण पदकांचा पाऊस पाडला. भारताने एकूण 22 सुवर्ण 16 रौप्य 23 कांस्य पदक पटकावलीत. भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर राहिला. विशेष म्हणजे भारत गेल्या सहा राष्ट्रकुल स्पर्धेत पदक तालिकेत पहिल्या पाचमध्ये आहे.

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने सर्वाधिक पदके कुस्तीत मिळवली. भारताने कुस्तीत 6 सुवर्ण 1 रौप्य तर 5 कांस्य पदकांची कमाई केली. त्यानंतर वेटलिफ्टिंमध्येही भारताने 10 पदकांची कमाई केली. त्यात 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई केली.

भारताने क्रीडा प्रकारानुसार मिळवलेली पदके

  • कुस्ती : 6 सुवर्ण 1 रौप्य तर 5 कांस्य एकूण 12

  • वेटलिफ्टिंग : 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य एकूण 10

  • अॅथलेटिक्स पॅरा अॅथलेटिक्स : 1 सुवर्ण 4 रौप्य 3 कांस्य एकूण 8

  • बॉक्सिंग : 3 सुवर्ण 1 रौप्य 3 कांस्य एकूण 7

  • टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस : 4 सुवर्ण 1 रौप्य 2 कांस्य एकूण 7

  • बॅडमिंटन : 3 सुवर्ण 1 रौप्य 2 कांस्य एकूण 6

  • ज्यूदो : 2 रौप्य, 1 कांस्य एकूण 3

  • लॉन बॉल्स : 1 सुवर्ण 1 रौप्य एकूण 2

  • स्क्वॉश : 2 कांस्य एकूण 2

  • हॉकी : 1 रौप्य 1 कांस्य एकूण 2

  • पॅरा पॉवरलिफ्टिंग : 1 सुवर्ण

  • महिला क्रिकेट : 1 रौप्य

CWG 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाने रौप्य पदक जिंकले

भारतीय पुरूष हॉकी संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून 7 - 0 ने पराभूत झाला. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदकाचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून... ..! सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 : भारतीय संघ हॉकीमध्ये 7-0 ने पिछाडीवर

हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7-० ने पिछाडीवर आहे. आता भारताचे पुनरागमन खूप कठीण झाले असून टीम इंडियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागू शकते.

CWG 2022 : बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदकांची हॅट्रिक; पुरूष दुहेरीतही जिंकले गोल्ड

भारताने बॅडमिंटन पुरूष दुहेरीत इंग्लंडचा 21 - 15, 21-13 गेम्सने पराभव करत भारताला बॅडमिंटनमधील तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. भारताच्या सात्विक साईराज रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंग्लंडच्या....! सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 : टेबल टेनिसमध्ये सुवर्ण चौकार; 40 वर्षाच्या शरथची दमदार कामगिरी

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकात आणखी भर पडली आहे. टेबल टेनिसपटू शरथ कमलने पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत शरथ कमलने....! सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 : टेबल टेनिसमध्ये शरथ कमल सामना सुरू

टेबल टेनिसमध्ये शरथ कमल आणि लियाम पिचफोर्ड यांच्यातील सामना सुरूच आहे. पहिला गेम गमावल्यानंतर शरथने शानदार पुनरागमन करत दोन गेम जिंकले आहेत. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना आणखी दोन सामने जिंकावे लागतील.

CWG 2022 : भारतीय जोडीने बॅडमिंटनमधील पहिला गेम जिंकला

बॅडमिंटनमध्ये भारतीय जोडीने पहिला गेम 21-15 अशा फरकाने जिंकला आहे. चिराग आणि सात्विक जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत आणि त्यांनी इंग्लंडविरुद्ध चांगला खेळ केला आहे. ही जोडी आज भारताला तिसरे सुवर्ण मिळवून देऊ शकते.

CWG 2022 : भारतीय संघ हॉकीमध्ये 4-0 ने पिछाडीवर

हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघ अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-0 ने पिछाडीवर आहे. भारतासाठी हा सामना जिंकणे खूप कठीण आहे.

Table Tennis : सातीयन गणसेकरनने केली अप्रतिम कामगिरी, रोमहर्षक सामन्यात जिंकले कांस्यपदक

टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीच्या सामन्यात सातीयनने इंग्लंडच्या ड्रंकहिलचा 11-9, 11-3, 11-5, 8-11, 9-11, 10-12, 11-9 असा पराभव केला. यासह त्याने कांस्यपदक पटकावले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 : बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिराग सामना सुरू झाला

बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडी यांच्याशी होईल.

CWG 2022 Lakshya Sen : लक्ष्य सेनचा सुवर्ण वेध; बॅडमिंटनमधील दुसरे गोल्ड

भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी देखील सुवर्ण धडाका कायम ठेवला. लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये पुरूष एकेरीत सुवर्ण पदक जिंकले. लक्ष्य सेनने बॅडमिंटन पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या ची याँग एनजीचा 21 -19, 9 -21, 16 - 21 गेममध्ये पराभव करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 : लक्ष्य सेनने दुसरा गेम जिंकला

लक्ष्य सेनने दुसरा गेम 21-9 अशा फरकाने जिंकून सामना 1-1 असा बरोबरी साधली आहे. पहिल्या गेममध्ये जबरदस्त संघर्षानंतर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र दुसऱ्या गेममध्ये त्यांनी शानदार पुनरागमन केले आहे.

CWG 2022 : टेबल टेनिसमध्ये कांस्यपदकासाठी साथियानचा सामना सुरू

टेबल टेनिस पुरुष एकेरीत कांस्यपदकासाठी साथियान आणि इंग्लंडच्या पॉल ड्रिंखॉल यांच्यात सामना सुरू झाला आहे.

CWG 2022 : लक्ष्य सेन पहिल्या गेममध्ये हरला

पहिल्या गेममध्ये मलेशियाच्या यंगने लक्ष्य सेनचा 21-19 अशा फरकाने पराभव केला. आता लक्ष्यला सुवर्णपदकावर दावा करण्यासाठी उर्वरित दोन गेम जिंकावे लागतील.

CWG 2022 : आता लक्ष्य सेनकडून आशा

पीव्ही सिंधूनंतर पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेनचा सामना मलेशियाच्या यंगशी होणार आहे. यंगने उपांत्य फेरीच्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतचा पराभव केला होता. अशा स्थितीत अंतिम सामनाही लक्ष्यासाठी सोपा नसेल.

CWG 2022: पी व्ही सिंधूने रचला इतिहास; भारताची 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी

PV Sindhun Commonwealth Games 2022 : बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने इतिहास रचला आहे. भारताने 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीचा.....! सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 : PV सिंधूने पहिला गेम जिंकला

पीव्ही सिंधूने पहिला गेम 21-15 अशा फरकाने जिंकला आहे. दुखापतीनंतरही सिंधू चांगली कामगिरी करत आहे.

CWG 2022 : पीव्ही सिंधूची सामना सुरू, नजर सुवर्णवर

बॅडमिंटनमधील महिला एकेरीचा अंतिम सामना सुरू झाला आहे. भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेलशी होणार आहे.

CWG 2022 : सिंधूचा सामना काही वेळात सुरू

बॅडमिंटनमधील महिला एकेरीचा अंतिम सामना दुपारी 1:20 वाजता सुरू होणार आहे. भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल लीशी होणार आहे. सिंधू या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिली असून तिला हा सामना जिंकून सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा आहे.

CWG 2022: अखेरच्या दिवशी भारताला आणखी चार ‘गोल्ड’ची आशा

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता स्पर्धेचा फक्त एक दिवस शिल्लक आहेत. रविवारचा दिवस भारतासाठी सुवर्ण दिवस ठरला. रविवारी भारताला 5 सुवर्णांसह एकूण 15 पदके मिळाली. अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला पछाडत चौथ्या स्थानावर पोहोचण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

CWG 2022 : दहावा दिवस भारतासाठी कसा होता, एक नजर त्याच्यावर..

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 10 व्या दिवशी भारताने पाच सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह एकूण 15 पदके जिंकली. निखत जरीन, अमित पंघल आणि नीतू यांनी बॉक्सिंगमध्ये चांगली कामगिरी केली. कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा दहावा दिवस भारतासाठी कसा गेला हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Commonwealth Games 2022, Birmingham Day 11 Live Updates : आज कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा 11 वा आणि शेवटचा दिवस आहे. दहाव्या दिवशी भारताने पाच सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह एकूण 15 पदके जिंकली. सिंधू आणि लक्ष्यच्या सुवर्णानंतर साथियानने कांस्यपदक जिंकले आहे. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 61 पदके जिंकली आहेत.

भारताची पदकसंख्या : 61

  • 22 सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी कुमार दहिया, विनेश फोगाट, नवीन, भाविना (पैरा टेबल टेनिस), नीतू घनघास, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निखत जरीन, अचंथा आणि श्रीजा, पीवी सिंधु, लक्ष्य सेन, सात्विक आणि चिराग शेट्टी, शरथ कमल

  • 16 रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरूष लॉन बॉल्स संघ, अब्दुल्ला अबोबैकर, शरथ आणि साथियां, सागर अहलावत, भारतीय महिला क्रिकेट संघ, भारतीय पुरुष हॉकी संघ

  • 23 कांस्य : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, लवप्रीत सिंह, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ, सौरव घोषाल, संदीप कुमार, अन्नू रानी, सौरव घोषाल-दीपिका, किदाम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, सातीयन गणसेकरन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com