Commonwealth games 2022: बॉक्सिंगमध्ये आज भारताचीच सत्ता?

सात पदकांसाठी लढा; उपांत्य फेरीच्या लढतींवर लक्ष
Commonwealth games 2022 nikhat zareen amit panghal five other players boxing assured of medals
Commonwealth games 2022 nikhat zareen amit panghal five other players boxing assured of medals sakal

बर्मिंगहॅम : भारतीय बॉक्सर्ससाठी आजचा (शनिवारी, ६ ऑगस्ट) दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. भारताचे एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क सात खेळाडू उपांत्य फेरीच्या लढतीसाठी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरणार आहेत. या सातही खेळाडूंचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील पदक पक्के आहे. येथे प्रश्‍न निर्माण होत आहे तो पदकाचा रंग कोणता असणार? या सर्व खेळाडूंनी उपांत्य फेरीचा अडथळा ओलांडल्यास त्यांचे किमान रौप्यपदक निश्‍चित होईल. अंतिम फेरीची लढत जिंकल्यास सुवर्णपदकावरही नाव कोरता येईल, पण उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत झाल्यास भारतीय खेळाडूंना ब्राँझपदकावरच समाधान मानावे लागणार आहे.

२०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन ब्राँझपदके जिंकली होती. यंदा मात्र यामध्ये घट झालेली आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला सात पदके मिळणार आहेत.

अमित, हुसामुद्दीनकडे पदकाचा रंग बदलण्याची संधी

अमित पांघल व मोहम्मद हुसामुद्दीन यांनी मागील अर्थातच गोल्ड कोस्टमधील स्पर्धांमध्ये पदके जिंकली होती. यंदाही या दोन खेळाडूंची पदके निश्‍चित झाली आहेत. यावेळी त्यांच्याकडे पदकाचा रंग बदलण्याची संधी असणार आहे. अमित पांघलने मागच्या वेळी रौप्यपदक, तर मोहम्मद हुसामुद्दीनने ब्राँझपदक पटकावले होते. यंदा दोघेही सुवर्णपदकासाठी सर्वस्व पणाला लावतील.

उपांत्य फेरीत प्रवेश करणारे भारतीय

पुरुष विभाग

अमित पांघल (५१ किलो वजनी गट)

मोहम्मद हुसामुद्दीन (५७ किलो वजनी गट)

रोहित टोकास (६७ किलो वजनी गट)

सागर अहलावत (९२पेक्षा जास्त किलो वजनी गट)

महिला विभाग

नीतू घंघास (४८ किलो वजनी गट)

निखत झरीन (५० किलो वजनी गट)

जास्मिन लॅमबोरीया (६० किलो वजनी गट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com