Commonwealth Games : 'पहिले सुवर्ण ते सर्वात मोठा संघ', भारताचे 15 माईल स्टोन

Commonwealth Games First Gold Medal To Largest Indian contingent 15 Historical Mile Stone
Commonwealth Games First Gold Medal To Largest Indian contingent 15 Historical Mile Stoneesakal

नवी दिल्ली : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये (Birmingham) यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धा (Commonwealth Games) रंगणार आहे. येत्या 28 जुलैपासून सुरू होणाऱ्या या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारत आपला 322 खेळाडूंचा तगडा संघ उतरवणार आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताला जास्तीजास्त पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. अनेक क्रीडा प्रकारात भारत सुवर्ण पदकाचा दावेदार असणार आहे. आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा प्रवास (Indias History Of Commonwealth Games) कसा राहिला आहे हे 15 पॉईंट्समध्ये पाहूयात.

Commonwealth Games First Gold Medal To Largest Indian contingent 15 Historical Mile Stone
Shikhar Dhawan : भारताने सामना जिंकला तरी कर्णधार शिखर धवन निराश

1 ) भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वात पहिले पदक हे कुस्तीत 1934 ला मिळवले होते. राशिद अन्वरने लंडनमध्ये झालेल्या पदक जिंकले होते.

2 ) भारताचे 1934 राष्ट्रकुल स्पर्धेत फक्त 6 खेळाडू सहभागी झाले होते.

3 ) भारताने 1934 मध्ये फक्त अॅथलेटिक्स आणि कुस्तीत सहभाग नोंदवला होता.

4 ) भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्यासाठी 1958 साल उजडावे लागले. या स्पर्धेत दिग्गज मिलखा सिंग यांनी कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

5 ) 1978 मध्ये भारताची महिला जोडी अमी घिआ आणि कनवल ठाकर सिंह यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. ते भारताकडून राष्ट्रकुलमध्ये महिलांनी मिळवलेले पहिले पदक ठरले.

6 ) 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत थाळी फेकमध्ये कृष्णा पूनियाने सुवर्ण पदक जिंकले होते. मिलखा सिंग यांच्यानंतर तब्बल 52 वर्षांनी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत आपले दुसरे सुवर्ण पदक पटकावले.

7 ) नेमबाज रूपा उन्नीकृष्णनने राष्ट्रकुल स्पर्धेत आपले नाव सुवार्णाक्षरांनी कोरले. ती भारताकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक जिंकणारी महिला ठरील. तिने 1998 मध्ये 50 मीटर एअर रायफल प्रकारात ही कामगिरी केली होती.

8 ) आतापर्यंत भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण 503 पदके जिंकली आहेत.

9 ) भारत राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाविना फक्त दोन वेळा परतला होता. भारताला 1938 मध्ये सिडनी येथे झालेल्या आणि 1954 मध्ये व्हॅनकोवर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळाले नव्हते.

10 ) भारताने 2010 मध्ये एडमाँटनला 46-22 ने मागे टाकत राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद मिळवले होते.

11 ) बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेतील प्रविण कुमार यांनी 1966 मध्ये किंगस्टन येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हॅमर थ्रोमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

12 ) भारताने 2002 पासून राष्ट्रकुल स्पर्धेत पदक तालिकेत पहिल्या पाचमधील आपले स्थान सोडलेले नाही.

13 ) थाळी फेकपटू रणजीत कुमार हा भारताचा पहिला पॅरा अॅथलिट होता त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकले. त्याने 2006 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते.

14 ) भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू हा नेमबाजपटू जसपाल राणा आहे. त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत 15 पदके जिंकली आहेत.

15 ) बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा 322 खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. भारताने यापूर्वी 2010 ला सर्वात मोठा संघ राष्ट्रकुल स्पर्धेत खेळवला होता. ही स्पर्धा भारतातच दिल्लीत झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com