
भारताची टेबल टेनिसमधील दोन पदके पक्की झाली आहेत. या दोन्ही पदकांमध्ये शरथ कमल या अनुभवी खेळाडूचा सहभाग मोलाचा असणार आहे.
Commonwealth Games 2022 : टेबल टेनिसमध्ये भारताची दोन पदके पक्की
बर्मिंगहॅम - भारताची टेबल टेनिसमधील दोन पदके पक्की झाली आहेत. या दोन्ही पदकांमध्ये शरथ कमल या अनुभवी खेळाडूचा सहभाग मोलाचा असणार आहे. भारतीय संघांनी पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी या दोन्ही गटांची अंतिम फेरी गाठली असून त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये भारताला किमान रौप्यपदकाची अपेक्षा करता येणार आहे.
शरथ व जी. साथियन या जोडीने पुरुषांच्या दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या निकोलस लम व फिन लू या जोडीवर ३-२ अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीची लढत जिंकली. शरथने श्रीजा अकुलाच्या साथीने मिश्र दुहेरीच्या लढतीत निकोलस लम व मिनह्यूंग जी या जोडीला ३-२ असे नमवत अंतिम फेरीत वाटचाल केली.
दरम्यान, शरथ व साथियन यांनी पुरुषांच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसेच महिला एकेरीत श्रीजा अकुला हिला ब्राँझपदकासाठी लढावे लागणार आहे.
मनिकाचे आव्हान संपुष्टात
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके जिंकणाऱ्या मनिका बत्रा हिला यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये एकही पदक जिंकता आले नाही. महिला सांघिक, महिला एकेरी, मिश्र दुहेरी व आता महिला दुहेरीतही तिला पराभवाचाच सामना करावा लागला.
Web Title: Commonwealth Games Table Tennis India Two Medal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..