Commonwealth Games 2022 : महिला हॉकीचे उपांत्य फेरीचे लक्ष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Commonwealth Games women hockey for semi finals India vs England today

Commonwealth Games 2022 : महिला हॉकीचे उपांत्य फेरीचे लक्ष्य

बर्मिंगहॅम - टोकियो ऑलिंपिकमध्ये थोडक्यासाठी ब्राँझपदक हुकले असले तरी आपल्या कामगिरीने तमाम हॉकीप्रेमींची मने जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार सुरुवात केली आहे. सलामीच्या लढतीत घाना या देशाला, त्यानंतर वेल्सला पराभूत करणाऱ्या भारतीय संघासमोर आता उपांत्य फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य असणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासमोर ‘अ’ गटातील लढतीत इंग्लंडचे आव्हान असणार आहे.

भारताचा ‘अ’ गटात समावेश असून यामध्ये भारतासह घाना, वेल्स, इंग्लंड व कॅनडा या देशांचा समावेश आहे. ‘ब’ गटामध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका व केनिया या देशांचा समावेश आहे. दोन्ही गटांतील प्रत्येकी दोन देश उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने उद्याच्या लढतीत विजय मिळवल्यास त्यांना अंतिम चारमध्ये पोहोचण्याची संधी असेल. याचमुळे पदक जिंकण्याच्या त्यांच्या आशा कायम राहणार आहेत.

दोन देशांमध्ये चुरस

‘अ’ गटामध्ये इंग्लंड व भारत या दोन देशांमध्ये कमालीची चुरस दिसून येत आहे. दोन्ही देशांनी प्रत्येकी दोन विजयांसह ६ गुणांची कमाई केली आहे. या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी अधिक आहे.

Web Title: Commonwealth Games Women Hockey For Semi Finals India Vs England Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sportsTeam Indiahockey
go to top