Hockey Jersey Controversy: हॉकी संघाच्या भगव्या जर्सीवरून वाद पेटला, अध्यक्षांना अंधारात ठेवून निर्णय घेतला... Email ने उडवली खळबळ; नेमका वाद काय?

Why Is India's Hockey Jersey Colour Controversial? भारतीय हॉकी संघाच्या पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी भगवी जर्सी वापरण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाला नवे वळण देताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी हा निर्णय आपल्या माहितीशिवाय घेण्यात आल्याचा दावा केला आहे.
Dilip Tirkey reacts to Hockey India saffron jersey row

Dilip Tirkey reacts to Hockey India saffron jersey row

Updated on

Hockey India president email on jersey controversy: भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंगावरून वाद वाढतच चालला आहे. संघाच्या जर्सीचा रंग निळ्यावरून 'भगवा' करण्याच्या निर्णयावरून सुरू असलेला विवाद आता अधिक चिघळला आहे. हॉकी इंडियाचे (Hockey India) अध्यक्ष आणि माजी कर्णधार दिलीप तिर्की यांनी या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट करत, हा निर्णय आपल्या किंवा कार्यकारिणीच्या मान्यतेशिवाय घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसा इ मेल त्यांनी पाठवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com