esakal | Copa Final: मारिया! अर्जेंटिनाला मिळवून दिली आघाडी
sakal

बोलून बातमी शोधा

Argentina vs Brazil

Copa Final: मारिया! अर्जेंटिनाला मिळवून दिली आघाडी

sakal_logo
By
सुशांत जाधव

Copa America 2021 Final : गत विजेत्या ब्राझील विरुद्धच्या फायनल लढतीत पहिल्याच हाफमध्ये मेस्सीच्या अर्जेंटिनाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या सुरुवातीला डी मारियाने पहिला गोल डागला. 22 व्या मिनिटाला मिळालेल्या या आघाडीनंतर अर्जेंटिनाचा संघ अधिक आक्रमक झालाय. पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाने आघाडी कायम राखण्यात यश मिळवत गत विजेत्या ब्राझीलला बॅकफूटवर ठेवण्यात यश मिळवले आहे.

क्लब मॅचेसमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे करणाऱ्या मेस्सीला अर्जेंटिनाला मोठी स्पर्धा जिंकून देण्यात अपयश आले आहे. कोपा अमेरिकन स्पर्धेत आता अर्जेंटिना आघाडीवर असून दुसऱ्या हाफमध्ये खेळात आणखी सुधारुन ही आघाडी भक्कम करण्यासाठी संघ प्रयत्नशील असेल. (Copa America 2021 Final Live Score Streaming Argentina vs Brazil Angel Di Maria Lionel Messi Neymar)

मेगा फायनलच्या लढतीसाठी 7 हजार 800 प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थितीत

दुसऱ्या हाफमध्ये ब्राझील चार्ज, अर्जेंटिनाचा संघ संघर्षात

-54 व्या मिनिटाला नेमारने दिलेल्या अप्रतिम पासवर रिचालीसनचा ओपन गोल करण्याची संधी मिळाली. पण अर्जेंटिना गोल किपरकडून उत्तम बचाव

-52 व्या मिनिटाला ब्राझीलनं गोल डागला, पण.. ऑफ साईडच्या झोलमुळे अर्जेंटिनाची आघाडी कायम

-46 व्या मिनिटाला ब्राझीलकडून बदली खेळाडू, रॉबर्टो फिर्मिनो याने घेतली फ्रेडची जागा

अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यातील आतापर्यंतचा रेकॉर्ड

-फायनल सामन्यातील पहिला गोल मॅच विनिंग ठरणार की ज्यूनिअर नेमारचा संघ मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करणार?

-लिओनेल मेस्सी आणि नेमार या बार्सिलोना संघातील आजी-माजी खेळाडूतील लढत

loading image