Copa : रक्ताळलेल्या पायाने मस्सी शेवटपर्यंत लढला

आपल्या खांद्यावरील जबाबदारी त्याने अर्ध्यावर सोडण्यापेक्षा शेवटपर्यंत लढण्याला प्राधान्य दिले.
Lionel Messi
Lionel MessiTwitter

फुटबॉल जगतातील स्टार लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेची फायनल गाठली. सेमी फायनलमध्ये त्यांनी कोलंबियाच्या संघाला पेनल्टी शूट आउटमध्ये पराभूत केले. या सामन्यात दुखापतग्रस्त होऊनही मेस्सी शेवटपर्यंत लढताना दिसला. मॅच सुरु असताना त्याच्या पायला दुखापत झाली होती. तरीही तो बाहेर गेला नाही. आपल्या खांद्यावरील जबाबदारी त्याने अर्ध्यावर सोडण्यापेक्षा शेवटपर्यंत लढण्याला प्राधान्य दिले. (Copa America Argentina vs Columbia Lionel Messi Played With Blood In His Ankles)

सोशल मीडियावर त्याच्या लढवय्या वृत्तीचं कौतुक होत आहे. पायाला झालेल्या दुखापतीनंतर तो मैदानात तळमळताना दिसला. पण मोक्याच्या क्षणी बाहेर पडलो तर स्पर्धेतून बाहेर जाण्याची नामुष्की येईल, हा विचार डोक्यात ठेवूनच तो लढला. त्याच्या पायाच्या घोट्यातून रक्त येत असलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. दुखापतीनंतरही पेनल्टी शूट आउटमध्ये त्याने पहिली किक यशस्वी गोलमध्ये रुपातंरित केली. या दुखापतीतून सावरुन ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल.

Lionel Messi
इटलीनं गाठली फायनल; स्पेनचा हिरो पेनल्टी शूट आउटमध्ये ठरला व्हिलन!

अर्जेंटिनाकडून रोड्रिगो डि पॉल गोल करण्यात अपयशी ठरला. पण मेस्सी, लिएंड्रो पारेडेज आणि लॉटेरो मार्टिनेजने गोल डागत संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले. कोपा अमेरिका 2021 मध्ये आता गतविजेता ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यात लढत रंगणार आहे.मंगळवारी झालेल्या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या हाफमध्ये कोलंबियाने सामना 1-1 बरोबरीत नेला. त्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.

सामन्यानंतर मेस्सी म्हणाला की, 'एमी (एमिलियानो गोलकिपर) वर आम्हाला भरवसा होता. त्याने आमचा विश्वास सार्थ ठरवला. या स्पर्धेत सर्व मॅचेस खेळण्याचा आम्ही मानस केला होता. फायनलमध्ये दमदार खेळ दाखवण्यासाठी उत्सुक आहोत. अर्जेंटिनाच्या विजयात गोलकिपर एमिलियानो मार्टिनेजने मोलाचा वाटा उचलला. त्याने पेनल्टीमध्ये प्रतिस्पर्धांचे तीन शॉट्स अडवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com