esakal | इटलीनं गाठली फायनल; स्पेनचा हिरो पेनल्टी शूट आउटमध्ये ठरला व्हिलन!
sakal

बोलून बातमी शोधा

Italy  vs Spain

इटलीनं गाठली फायनल; स्पेनचा हिरो पेनल्टी शूट आउटमध्ये ठरला व्हिलन!

sakal_logo
By
सुशांत जाधव

EURO 2020 Italy vs Spain Match : ज्या अल्वेरा मोराटाने स्पेनला पेनल्टी शूट आउटमध्ये नेले त्यानेच पेनल्टी शूट आउटमध्ये किक मिस केली आणि स्पेनचा संघ युरो कप स्पर्धेतून बाहेर पडला. निर्धारित वेळेत 1-1 स्कोअर बरोबरीत राहिल्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेला सामना इटलीने पेनल्टी शूट आउटमध्ये 4-2 असा जिंकत फायनल गाठली. आता इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यातील विजेत्या विरुद्ध इटलीचा संघ वेम्बली स्टेडियमवरच फायनल खेळेल. (ROBERTO MANCINI'S ITALY REACHES THE FINAL OF EURO 2020 WITH A 4-2 WIN IN THE PENALTY SHOOTOUT)

युरो कप स्पर्धेतील वेम्बली स्टेडियमच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये इटली आणि स्पेन यांच्यातील लढतीत फायनलसाठी कांटे की टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या हाफमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. फायनलचं तिकीट एवढ्या स्वस्तात मिळणार नाही, हेच पहिल्या हाफमधील खेळात स्पष्ट झाले. युरो कपमध्ये सर्वाधिक जेतेपद मिळवणाऱ्या स्पेनने पहिल्या हाफमध्ये इटलीला फार संधी दिली नाही. खेळ पाहणाऱ्यांसाठी हे चित्र दिसले असले तरी एका बाजूने पहिला हाफ स्पेनने गाजला असे वाटत असले तरी यंदाच्या स्पर्धेतील इटलीची रणनिती अगदी सुरुवातीला संयम आणि त्यानंतर आक्रमण अशी राहिली आहे. इटलीने त्याच रणनितीमध्ये खेळ दाखवत पहिला गोल करण्यासाठी तब्बल एक तास घेतला. फ्रेडरिक चियासाने दुसऱ्या हाफमधील 60 व्या मिनिटाला संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

हेही वाचा: इंग्लंडची टीम बदलली, पण टीम इंडियाची सुट्टी जैसे थे!

फ्रेडरिक चियासाने दोन डिफेंडरला चकवा देत केलेला हा गोल इटलीचा फायनल तिकीट मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरला नाही. बदली खेळाडू म्हणून आलेल्या स्पेनच्या अल्वारो मोराटाने सामन्याला आणखी एक कलाटणी दिली. पहिल्या गोलनंतर 20 मिनिटांनी त्याने स्पेनला पुन्हा सामन्यात आणले. अल्वारो मोराटाच्या गोलच्या जोरावार स्पेनने सामन्यात 1-1 बरोबरीत आणली. त्यानंतरच्या निर्धारित वेळेसह इंज्युरी टाईमच्या 3 मिनिटात सामना 1-1 बरोबरीत सुटला. आणि फायनलिस्ट होण्यासाठीचा निकाल हा एक्स्ट्रा टाईममध्ये पोहचला. एक्स्ट्रा टाईमध्ये 1-1 बरोबरीत राहिलेल्या सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउटमध्ये गेला आणि यावेळी इटलीने बाजी मारली.

पेनल्टी शूट आउटमध्ये नेमकं काय घडलं

ज्या अल्वेरा मोराटाने स्पेनला पेनल्टी शूट आउटमध्ये नेले त्यानेच पेनल्टी शूट आउटमध्ये किक मिस केली आणि स्पेनचा संघ युरो कप स्पर्धेतून बाहेर पडला. निर्धारित वेळेत 1-1 स्कोअर बरोबरीत राहिल्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेला सामना इटलीने पेनल्टी शूट आउटमध्ये 4-2 असा जिंकत फायनल गाठली. स्पेनच्या डॅनी ओल्माने पहिला शॉट थेट क्रॉसबारच्या वरुन मारला आणि स्कोअर दोन्ही संघाची पहिली किक शून्य ठरली. इटलीकडून दुसरी किक घेणाऱ्या अँड्रिया बेलोट्टीने इटलीला 1-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनच्या जेरार्ड मोरेनो याने कोणतीही चूक न करता संघाला 1-1 असे बरोबरीत आणले. अनुभवी लिओनार्डो बोनुचीने तिसरी किक घेतली आणि गोलपोस्ट भेदण्यात यश मिळवले. त्यानंतर स्पॅनिश मिडफिल्डर थिआगो अल्कंटारानेही किक गोलमध्ये बदलली. दोन्ही संघांनी पहिल्या तीन किकमध्ये 2-2 अशी बरोबरी केली होती. इटलीच्या फेडरिको बर्नार्डिची याने इटलीला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.

इटलीचा गोलकिपर ग्यानलुइगी डोन्नरम्मा याने स्पेनला सामन्यात 1-1 गोल बरोबरी करुन देणारा हिरो अल्वारो मोराटाचा चेंडू अ़डवला आणि इटलीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. ज्या मोराटाने संघाला बरोबरी साधून एक्ट्रा टाईम ते पेनल्टी शूट आउटमध्ये आणले त्याची चूक स्पेनला भारी पडली. स्पेनचा यंदाच्या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.

loading image