esakal | ऑलिंपिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशीमा यांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Virus

जपान ऑलिंपिक समितीच्या उपप्रमुखांना कोरोना झाल्यामुळे ऑलिंपिक संयोजनासाठी जपान किती सुरक्षित आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आणि जागतिक क्रीडा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांतील चर्चेत ऑलिंपिकबाबत विस्तृत चर्चा होईल, असे सांगितले जात आहे.

ऑलिंपिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशीमा यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन - जपान ऑलिंपिक समितीच्या उपप्रमुखांना कोरोना झाल्यामुळे ऑलिंपिक संयोजनासाठी जपान किती सुरक्षित आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आणि जागतिक क्रीडा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांतील चर्चेत ऑलिंपिकबाबत विस्तृत चर्चा होईल, असे सांगितले जात आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जपान ऑलिंपिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशीमा यांनी एका पत्रकाद्वारे आपल्याला कोरोना झाल्याचे जाहीर केले. ताशीमा हे जपान फुटबॉल संघटनेचेही अध्यक्ष आहेत. ‘मला ताप आला होता. त्यामुळे चाचणी झाली, त्यात न्यूमोनियाची लक्षणे आढळली. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार उपाय करीत आहे’, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. या पत्रकातच त्यांनी आपण पंधरा दिवस युरोप; तसेच अमेरिकेत होतो. त्या वेळी तिथे कोरोनाची भीती जाणवली नाही. अनेक जण हस्तांदोलन करीत होते, असेही त्यांनी सांगितले.