esakal | मुंबईतील स्थानिक क्रिकेटचा शुभारंभ; तालीम शिल्डचे एकाच दिवशी नऊ सामने पूर्ण | Mumbai Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai cricket

मुंबईतील स्थानिक क्रिकेटचा शुभारंभ; तालीम शिल्डचे एकाच दिवशी नऊ सामने पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे (corona) बंद पडलेले मुंबईचे स्थानिक क्रिकेट (mumbai cricket) पद्माकर तालीम शिल्ड (padmakar talim shield) स्पर्धेद्वारे अखेर आजपासून सुरू झाले. आजच्या एकाच दिवशी विविध मैदानांवर मिळून नऊ सामने झाले. बीसीसीआयची (BCCI) राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धा (T-20 Cricket) असल्यामुळे त्यासाठी तालीम शिल्ड स्पर्धा ट्वेन्टी-२० प्रकाराची करण्यात आली. वांद्र्याच्या एमआयजी क्लबवर (MIG Club) माजी कसोटीपटू लालचंद राजपूत (lalchand Rajput) यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून स्पर्धा खेळवली जात आहे.

हेही वाचा: ठाणे पालिका प्रभाग समितीतील १७० जणांच्या बदल्या

संक्षिप्त निकाल ः पारसी जिमखाना २० षटकांत ८ बाद १९४ (निखिल पाटील ७१, सचिन यादव ३२, विक्रांत औती ३१, शम्स मुलानी ३०) वि.वि. दादर युनियन १६.१ षटकांत सर्वबाद १११ (शम्स मुलानी ३-१५).
सीसीआय ः २० षटकांत ६ बाद १८६ (सक्षम पराशर ७५, गौरव जठार ४०, वरद वझे ३-३५) वि. वि. दादर पारसी कॉलनी ः २० षटकांत ६ बाद १४५ (स्वामीनाथन ४५, हर्षित जनवालकर ४०, योगेश सावंत ३४).
रिगल क्रिकेट क्ल्ब ः १५.५ षटकांत सर्वबाद ६५ (नदीम शेख ३-१५). पराभूत वि. मुंबई पोलिस जिमखाना ः ८ षटकांत ४ बाद ६७.

loading image
go to top