esakal | CPL 2021 1st Semi Final: पोलार्डचा आनंद अन् मार्कचा धमाका (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

Mark Deyal

CPL 2021 1st Semi Final: पोलार्डचा आनंद अन् मार्कचा धमाका (VIDEO)

sakal_logo
By
सुशांत जाधव

वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रिमीयर लीग स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. बासटेर सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कच्या मैदानात ट्रिनबॅगो नाईट रायडर्स आणि सेंट लुसिया किंग्ज यांच्यात स्पर्धेतील पहिला सेमी फायनल सामना रंगला आहे. सेंट लुसियाचा कर्णधार रहकीम कॉर्नवाल याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय व्यर्थ ठरला. आंद्रे फ्लेंचरच्या साथीने त्याने सेंट लुसियाच्या डावाला सुरुवात केली. पहिल्याच षटकात तो उत्तुंग फुटका मारण्याच्या नादात आउट झाला.

ट्रिनबॅगोकडून ए हुसेन याने पहिले षटक टाकले. प्रतिस्पर्धी संघाच्या धावफलकावर अवघी एक धाव चौथ्या चेंडूवर त्याने कर्णधार रहकीम कॉर्नवाल याला तंबुत धाडले. कॉर्नवालने 3 चेंडूचा सामना करुनही त्याला खाते न उघडता माघारी परतावे लागले. सीमारेषेवर फिल्डिंग करत असलेल्या केरॉन पोलार्डने त्याचा झेल टिपला. ही विकेट ट्रिनबॅगोसाठी खूप मोठी अशीच होती. त्यामुळेच कॅच घेतल्यानंतर कर्णधार पोलार्डने कॅरेबियन स्टाइलमध्ये जोरदार सेलिब्रेशन करत आनंद व्यक्त केला.

हेही वाचा: शाब्बास मुलींनो! विरारच्या दोघींची १९ वर्षाखालील संघात निवड

पहिली विकेट अवघ्या एका धावेवर पडल्यानंतर मार्क डायलेनं फ्लेंचरच्या साथीनं डावाला आकार दिला. एका बाजूला आंद्रे फ्लेचर धावा करण्यासाठी संघर्ष करत असताना दुसऱ्या बाजूला मार्क डायलेनं आपल्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला. खणखणीत चौकार खेचत त्याने 23 चेंडूत अर्धशतक साजरे केले. अर्धशतकी खेळीत त्याने 5 चौकार आणि 4 षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले.

loading image
go to top