esakal | शाब्बास मुलींनो! विरारच्या दोघींची १९ वर्षाखालील संघात निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Virar-Female-Cricketers

सप्टेंबर अखेरीस राजकोट रंगणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत दोघी खेळणार

शाब्बास मुलींनो! विरारच्या दोघींची १९ वर्षाखालील संघात निवड

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार: पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात क्रिकेटपटू पुढे येऊ लागले आहेत. नुकताच अर्नाळा येथील नेस्टर धंबा याची ओमानच्या क्रिकेट संघात निवड झाली. त्याला टी२० विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळाले. असे असताना आता विरारच्या झील डिमेलो आणि बतूल परेरा या दोन मुलींनी कमाल करून दाखवली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या १९ वर्षाखालील वयाच्या मुलींच्या संघात या दोघींची निवड झाली आहे. मुंबईचा संघ BCCI मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील साखळी स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धा २८ सप्टेंबरपासून राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी मुंबईच्या संघातून झील आणि बतूल यांची निवड झाली आहे.

हेही वाचा: "कोण होता तो क्रिकेटर.. त्याला माझ्यासमोर आणा"; गावसकर संतापले

झील डिमेलो आणि बतूल परेरा या दोघी गेल्या ५ वर्षांपासून अमेया स्पोर्ट्स अकादमी येथे सराव करत आहेत आणि मार्गदर्शन घेत आहेत. अमेया स्पोर्ट्स अकादमीच्या गोल्डन स्टार क्रिकेट अँकेडमीमध्ये प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांच्याकडून या दोघी प्रशिक्षण घेत आहेत. सलग दुसऱ्यांदा या दोघींची या वयोगटात निवड झाली आहे.

प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांच्यासह झील डिमेलो आणि बतूल परेरा

प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांच्यासह झील डिमेलो आणि बतूल परेरा

१६ वर्षाची झील डिमेलो ही डावखुरी आहे. ती वेगवान गोलंदाजी करते. तर १८ वर्षीय बतूल परेरा हीदेखील डावखुरी असून ती फिरकी गोलंदाज आहे. लॉकडाउनमध्ये सर्व प्रकारचा सराव बंद होता. मात्र, अनलॉकनंतर आता या दोघी आपल्या सीनियर खेळाडूंबरोबर कसून सराव करत असल्याचे दिसत आहे. यशवंत नगर, विरार येथील क्रीडांगणावर माजी महापौर राजीव पाटील यांच्या सहकार्याने प्रशिक्षक संतोष पिंगुळकर हे अकॅडमीत येणाऱ्या सुमारे ३५ मुलींना याठिकाणी मोफत प्रशिक्षण देतात.

(संपादन- विराज भागवत)

loading image
go to top