इंग्लंडच्या कसोटी संघात पहिल्यांदाच दोन 'जुळ्या' भावांचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Craig Overton Jamie Overton Twins Brother Included In England Test Squad For 3rd Test Against New Zealand

इंग्लंडच्या कसोटी संघात पहिल्यांदाच दोन 'जुळ्या' भावांचा समावेश

लीड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी 14 खेळाडूंच्या इंग्लंड संघाची घोषणा झाली आहे. या संघात सरेचा वेगावान गोलंदाज जेमी ओव्हरटन याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधीपासूनच इंग्लंडच्या कसोटी संघात असलेल्या क्रेग ओव्हरटनपेक्षा तीन मिनिटांनी लहान आहे. (Craig Overton Jamie Overton Twins Brother Included In England Test Squad For 3rd Test Against New Zealand)

जेमीने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये 21 विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावरच त्याला इंग्लंड संघात स्थान मिळाले आहे. 28 वर्षाच्या या खेळाडूला 2013 मध्ये इंग्लंडच्या वनडे संघात देखील स्थान मिळाले होते. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दुखापतींनी ग्रासल्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान मिळवायला 2022 उजडावे लागले.

हेही वाचा: टीमसोबत न दिसलेला कर्णधार रोहित 'या' दिवशी होणार इंग्लंडला रवाना

जेमी ओव्हरटन यापूर्वी क्रेग ओव्हरटनबरोबर सोमरसेटमध्ये एकत्र खेळला आहे. याचबरोबर हे दोन ओव्हरटन जुळे बंधू काउंटी क्रिकेटमध्ये एकमेकांविरूद्ध खेळले आहेत. यावेळी जेमीने क्रेगला बाऊन्सर मारून त्याला चांदण्या दाखवल्या होत्या. विशेष म्हणजे यापूर्वी इंग्लंडकडून जुळ्या भावंडांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. क्रेग न्यूझीलंडविरूद्धच्या गेल्या दोन कसोटी सामन्यापासून बेंचवर बसून आहे आता क्रेग आणि जेमी या दोघा जुळ्या भावांना एकत्र इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळते का आणि विक्रम प्रस्थापित होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: IPL Media Rights : नीता अंबानी यांची पहिली प्रतिक्रिया

न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठीचा इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स ( कर्णधार ), जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रुक्स, झॅक क्रावली, बेन फोक्स, जॅक लिच, अॅलेक्स लीस, क्रेग ओव्हरटन, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू पॉट्स, ऑली पोप, जो रूट.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे 23 जून ते 27 जून दरम्यान खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी इंग्लंडने जिंकत मालिका आधीच 2 - 0 ने खिशात घातली आहे.

Web Title: Craig Overton Jamie Overton Twins Brother Included In England Test Squad For 3rd Test Against New Zealand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top